PDKV : ‘पंदेकृवि’च्या शिवार फेरीला प्रतिसाद

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आयोजित शिवार फेरी शेतकऱ्यांसाठी उत्सुकतेचा भाग बनली आहे.
PDKV AKOLA
PDKV AKOLA Agrowon

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आयोजित शिवार फेरी शेतकऱ्यांसाठी उत्सुकतेचा भाग बनली आहे. विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रावर असलेले नवनवीन तंत्रज्ञान, वाणाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी उत्सुकता दाखवत आहे.

PDKV AKOLA
Agriculture Department : ‘संवर्ग-२’च्या प्रश्‍नांवर तत्काळ तोडगा काढा

शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.१९) पाऊस नसल्याने शिवार फेरीला प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (ता.२०) समारोपाला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सचिव एकनाथ डवले यांची प्रमुख उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

PDKV AKOLA
Crop Damage Curvey : अतिवृष्टीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ः फुंडकर

मंगळवारी (ता.१८) शिवारफेरीचे उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी १७५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शिवार फेरीला दुसऱ्या दिवशी बुलडाणा, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची लक्षणीय गर्दी झाली होती.

उद्यानविद्या विभाग, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, शेतमाल प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, कापूस संशोधन विभाग, लिंबूवर्गीय फळे संशोधन विभाग, सोयाबीन प्रक्षेत्र, ज्वारी संशोधन विभाग, धान्य संशोधन विभाग, तेलबिया संशोधन विभाग, कोरडवाहू संशोधन विभाग, यासह पशुसंवर्धन, दुग्धशास्त्र विभाग आणि नागार्जुन वनौषधी उद्यानाला शेतकरी हजेरी लावली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com