बसवंत हनी बी पार्क’ ला रिस्पॉन्सिबल टुरिझम ॲवॉर्ड

मध्य प्रदेशच्या पर्यटनमंत्री उषा ठाकूर यांच्या हस्ते सन्मान
Baswant Honey bee Park)
Baswant Honey bee Park)Agrowon

नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ‘बसवंत हनी बी पार्क’ला (Baswant Honey bee Park) जागतिक स्तरावर कार्यरत ‘वर्ल्ड टुरिझम मार्केट’या संस्थेतर्फे ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ यासाठी देण्यात येणारा ‘वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट - रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भोपाळ येथे बुधवारी (ता. ७) झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटचे सल्लागार व इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझमचे अध्यक्ष हॅरॉल्ड गुडवीन व मध्य प्रदेशच्या पर्यटनमंत्री उषा ठाकूर यांच्या हस्ते ग्रीनझोन अ‍ॅगोकेमचे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Baswant Honey bee Park)
मधमाशी पालन शेतीपूरक व्यवसाय आहे?

‘नैसर्गिक वारसा आणि जैवविविधतेमध्ये पर्यटनाचे योगदान वाढवणे’ या श्रेणीमध्ये संस्थेला रौप्यपदकाने सन्मानित करण्यात आले. तर या श्रेणीत सुवर्णपदक हे मध्य प्रदेश पर्यटन मंडळाला मिळाले. या स्पर्धेत देशभरातील पर्यटन क्षेत्रातील मान्यवर संस्थांनी सहभाग नोंदविला होता.
‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा. लि.’ या कंपनीतर्फे पिंपळगाव बसवंत येथे ‘हनी बी पार्क’ची स्थापना करण्यात आली आहे. येथे वर्षभर पर्यटन महोत्सव, राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद यांसह इतर अनेक उपक्रम राबविले जातात. या शेतीपूरक तसेच पर्यावरणस्नेही अभ्यास-प्रकल्पाला पर्यटकांचा दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद लाभत आहे. मधमाश्यांद्वारे परागीभवनातून होणारी उत्पादन वाढ लक्षात घेता ‘बसवंत हनी बी पार्क’मध्ये शेतकरी, विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकांसाठी सर्व सुविधायुक्त मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी राज्यस्तरीय परिसंवादाचे स्वरूप व्यापक करून राष्ट्रीय स्तरावरील मधुक्रांती परिसंवाद आयोजित करण्याचा मानस पवार यांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com