Food security : अन्नसुरक्षेसाठीच निर्यातीवर बंधनेः पीयूष गोयल

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून गरीबांना दरवर्षी १०८ दशलक्ष टन अन्नधान्य मोफत दिले जाते, असे केंद्रीय अन्न मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये अन्नधान्याचं उत्पादन घटण्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Piysh Goyal
Piysh Goyal Agrowon

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून गरीबांना (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana)दरवर्षी १०८ दशलक्ष टन अन्नधान्य मोफत दिले जाते, असे केंद्रीय अन्न मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितले. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये अन्नधान्याचं उत्पादन (Food Production) घटण्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र अवकाळी पाऊस (Heavy Rainfall) सुरू असल्याने या उत्पादनाचा नेमका अंदाज अजून आलेला नाही. फेडरेशन ऑफ तेलंगणा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (Federation of Telangana Chambers of Commerce and Industry) आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Piysh Goyal
Food Security : भारताची अन्नधान्य स्वयंपूर्णता टिकाऊ नाही

गोयल म्हणाले की, देशातल्या ८० कोटी लोकांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्याचं वितरण करण्यात येत आहे. तर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय कुटुंबांसाठी ३५ किलो धान्य वितरित केलं जातं. आता हा कोटा पाच किलोने वाढवण्यात आलाय. आपल्याला दर महिन्याला ४० लाख टन अन्नधान्याची गरज असते.

त्याव्यतिरिक्त आपल्याला आता ५० लाख टन अन्नधान्याची गरज भासणार आहे. म्हणजे दर महिन्याला एकूण ९० लाख टन गहू आणि तांदळाची आवश्यकता आहे. थोडक्यात एका वर्षात गरिबांना या योजनेतून १०८ दशलक्ष टन अन्नधान्या मोफत वितरित केलं जातं असं गोयल म्हणाले. ते म्हणाले की, भारताने मागच्या महिन्यापर्यंत अन्नधान्याच्या निर्यातीस प्रोत्साहन दिलं होतं.

मात्र आज संपूर्ण जगाची अन्नसुरक्षा धोक्यात आली असताना सरकारने आपल्या लोकांची अन्नसुरक्षा सुनिश्चित करणं आवश्यक आहे. त्यामुळे तांदूळ निर्यातीवर लावलेला २० टक्के कर योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या तांदळाचे भाव स्थिर असल्यामुळे सरकारने अन्नधान्याची निर्यात थांबवलेली नसल्याचं गोयल यांनी म्हटलंय.

गोयल यावेळी निर्यातीवर बोलताना म्हणाले की, "भारताने मागच्या वर्षात ६७५ बिलियन यूएस डॉलर्सची निर्यात केली आहे. २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यात यात १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. या वर्षात आपण ७५० बिलियन यूएस डॉलर्सचा आकडा पार करू अशी आशा आहे." निर्यात धोरणामुळे भारताचं भविष्य ठरणार असून भारत जगाचं उत्पादन केंद्र व्हायला हवं, असेही ते यावेळी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com