धान्य, डाळीवरील जीएसटीचा पुर्नविचार करा : अग्रवाल

ग्राहकांच्या अनुपस्थितीत पॅकिंग करून ठेवलेल्या वस्तूंवर ती माल पूर्व-पॅकेज केलेल्या वस्तूंच्या व्याख्येखाली येतात. त्या कायद्याअंतर्गत जीएसटी (GST) लावण्यात आलेला आहे.
GST
GSTAgrowon

नागपूर : नॉन ब्रॅण्डेड पीठ, डाळी, कडधान्य आणि इतर खाद्यपदार्थांवर पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याचा निर्णय जीएसटी (GST) कौन्सिलने घेतला आहे. त्याबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी करणारे निवेदन चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड (कॅमिट) चे अध्यक्ष डॉ. दीपेन अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना दिले.

डॉ. अग्रवाल यांनी सांगितले की, वजन माप नियमन कायदा (एलएम अॅक्ट) आणि नियमांच्या तरतुदींचे एकत्रित वाचन केल्यास असे लक्षात आले की, ग्राहकांच्या अनुपस्थितीत पॅकिंग करून ठेवलेल्या वस्तूंवर ती माल पूर्व-पॅकेज केलेल्या वस्तूंच्या व्याख्येखाली येतात.

त्या कायद्याअंतर्गत जीएसटी (GST) लावण्यात आलेला आहे. १ ते २५ किलोपर्यंतच्या पॅकिंगच्या वस्तूंवर जीएसटी लावला आहे. हा निर्णय अव्यवहार्य आहे. एलएम कायद्याचा उद्देश ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे आहे. उत्पादन, पॅकेज, आयात किंवा विहित प्रमाणात किंवा संख्येने विक्री करणे.

वजन माप कायदा ग्राहकाच्या उपस्थितीत विक्रेत्याने वस्तूंचे पॅकिंग करण्याच्या कार्यक्षेत्रातून सूट देतो, ग्राहकाने त्याच्या उपस्थितीत पॅक केलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेची आणि प्रमाणाची काळजी घेतली आहे, असे त्यातून दर्शवायचे आहे का, असा प्रश्न उपस्थित करून या जीएसटीच्या (GST) निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. अग्रवाल यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com