Monsoon : मॉन्सून लवकरच परतीच्या प्रवासावर

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून देशात यंदा वेळेच्या आधाच दाखल झाला होता. तर वेळेच्या आधीच परतीच्या प्रवासावरही लवकरच निघण्याचे संकेत आहेत.
Monsoon
MonsoonAgrowon

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून (Monsoon) देशात यंदा वेळेच्या आधाच दाखल झाला होता. तर वेळेच्या आधीच परतीच्या प्रवासावरही (Monsoon Return Journey) लवकरच निघण्याचे संकेत आहेत.

Monsoon
Cotton : गुजरातमध्ये नवीन कापूस १२ हजारांवर

यंदाच्या हंगामात सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधी २९ मे रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी मॉन्सून तळकोकणात दाखल झाला. त्यानंतर १५ जून रोजी मॉन्सूनने जवळपास महाराष्ट्र व्यापला. पुढील वाटचालही काहीशी अडखळत झाली, तरीही नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच मॉन्सूनने देश व्यापला. २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

Monsoon
Soybean : सोयाबीन आणि युरियाची मात्रा

हवामान विभागानं २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या दोन आठवड्यांच्या कालावधीसाठीचा हवामान अंदाज गुरूवारी जाहीर केला. यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानातून मॉन्सून परतण्यास पोषक वातावरण तयार होत असल्याचं नमुद केलं.

पुर्वी १ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र २०२० मध्ये मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळपत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली.

मॉन्सून हंगामात शुक्रवारपर्यंतदेशभरात ७१७.६ मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर मॉन्सून मुक्तहस्त कोसळल्यानं महाराष्ट्रात ९४८ मिलीमीटर म्हणजेच २३ टक्के अधिक पाऊस पडलाय. कोकणात सरासरी इतका तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. अद्यापही महिनाभराचा हंगाम शिल्लक असल्यानं या काळात किती पाऊस पडणार याकडे शेतकऱ्याचं लक्ष आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com