Monsoon Update : परतीच्या पावसाने शेतशिवारे जलमय

राज्याच्या भागात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कमी वेळात पडणाऱ्या जोरदार पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजविला आहे. शेतशिवार जलमय झाल्याने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या भागात परतीच्या पावसाने (Monsoon Return Journey) दमदार हजेरी लावली आहे. कमी वेळात पडणाऱ्या जोरदार पावसाने (Heavy Rain) पुन्हा एकदा हाहाकार माजविला आहे. शेतशिवार जलमय (Agriculture Field Flooded) झाल्याने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. सोयबीन (Soybean), कापूस (Cotton), भात, उडीद या काढणीस आलेल्या पिकांसह मका, द्राक्षाबागांना (Vineyard) या पावसाने फटका बसणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांशी भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. संततधार पावसाने खरीप पिकांच्या मळणीसह सर्व नियोजन कोलमडले आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये ही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे भात व सोयाबीन ची मळणी मात्र पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र होते. या पावसाने ऊस तोडणीच्या कामांना विलंब होणार आहे.

Monsoon Update
Mango Crop Insurance : कोकणातील आंबा पिकासाठी विमा योजना

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सोमवारी (ता.१०) सायंकाळी सहा वाजता जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. उपळे, मळेगाव, पानगाव, गौडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. काढणीला आलेले सोयाबीन, उडीद, मका, लागवड केलेला कांदा मातीमोल झाला आहे. द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू असल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडला आहे.

Monsoon Update
Crop Loan : लासलगाव समितीतर्फे यंदाही शेतीमाल तारण कर्ज योजना

सांगली जिल्ह्यात मंगळवारी (ता. ११) पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील आगाप पेरणी केलेल्या पिकांना पोषक ठरणार असला तरी, काढणीला आलेल्या पिकांना अडथळा ठरत आहे. सांगली शहरासह मिरज, पलूस, वाळवा या तालुक्यांत अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठे महांकाळ आणि तासगाव तालुक्यांत मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाची रिपरिप मंगळवारीही (ता. ११) सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील भातपीक कापणी रखडली आहे. परतीच्या पावसामुळे भातपीक संकटात सापडले आहे. जिल्ह्यात ६० ते ६५ टक्के भातपीक परिपक्व झाले आहे. परतीच्या पावसाचा जोर आणखी तीन-चार दिवस राहिल्यास या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे,

Monsoon Update
Paddy Crop Damage : पेणमध्येही भात पिकाला फटका

मराठवाड्यात परतीच्या पावसाने मराठवाड्यातील अनेक भागात काढणीला आलेल्या पिकांची वाहतात होत आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मंगळवारी हलका, ते जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या या पावसाने फुटलेल्या कापसाच्या वाती करणे सुरू केले आहे. दुसरीकडे काढणीला आलेल्या सोयाबीनची ही पावसामुळे माती होण्याची चिन्हे आहेत.

जालना जिल्ह्यातील अंकूशनगर परिसरात विजेच्या कडकडाटासह चार तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी झाले. पावसाने भिजल्याने वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहे. हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे हिरावला आहे. पावसाने नदी नाले वाहिले, शेतशिवारे जलमय झाली आहेत.

मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पोलादपूर ६०, देवगड, सावंतवाडी, कणकवली प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : जामनेर ९०, नाशिक, इगतपुरी प्रत्येकी ७०, भुसावळ, कळवण, हातकणंगले, करमाळा प्रत्येकी ६०, कसबेडिग्रज ५०, सांगोला, वेल्हे प्रत्येकी ४०, एरंडोल, जामखेड, दौंड, मंगळवेढा, पौड प्रत्येकी ३०, आजरा, सिन्नर, धाडगाव, यावल, कर्जत, शिरोळ प्रत्येकी २०.

मराठवाडा : देवणी ६०, शिरूर अनंतपाळ ५०, लातूर, उमरगा प्रत्येकी २०, आष्टी, परंडा प्रत्येकी १०.

विदर्भ : तुमसर ४०, परशिवणी, धानोरा, रामटेक, धारणी, सेलू, नरखेडा, बल्लारपूर प्रत्येकी ३०, गोरेगाव, कामठी, अंजनगाव, लाखणी, मोहाडी, भंडारा, मंगरूळपीर, सिंदेवाही, मूर्तिजापूर प्रत्येकी २०.

- पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहिले

- कोल्हापूर जिल्ह्यात मळणीच्या कामांना अडथळा

- सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन, उडीद, द्राक्ष, कांद्याचे नुकसान

- जालना जिल्ह्यात वेचणीस आलेला कापूस भिजला

- सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी

- सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीची कामे रखडली

- मराठवाड्यात परतीच्या पावसाने पिकांची वाताहत

- नागपूर, अकोला जिल्ह्यातही पिकांचे नुकसान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com