Irrigation:सर्व उपसा सिंचन योजनांचा वीजदर पूर्ववत: शिवतारे

माजी राज्यमंत्री शिवतारे यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी असताना त्यांनी उपसा सिंचन (Lift Irrigation) योजनांचा वीजदर १ रुपया १६ पैसे प्रतियुनिट करून अवघ्या १९ टक्के दरात राज्यभरातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले होते.
Lift Irrigation
Lift IrrigationAgrowon

सासवड, जि. पुणे: पुरंदर तालुक्यातील पुरंदर आणि जनाई उपसा सिंचन योजनांचा वाढलेला वीजदर कमी करून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अवघ्या १९ टक्के रकमेत पाणी मिळणार आहे. याबाबतचा आदेश ऊर्जा आणि उद्योग विभागाने काढला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यांनी ही मागणी मान्य करून उपसा योजनेचे दर पूर्वीसारखे करण्याचे आश्‍वासन दिले होते. राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबत शासन आदेश काढत वीजदर पूर्ववत करण्याचा निर्णय जारी केला आहे.

या निर्णयामुळे पुरंदर तालुक्यातील दिवे पंचक्रोशी, आंबोडी, सिंगापूर, वनपुरी, गुरोळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, पारगाव, खानवडी, राजेवाडी, टेकवडी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, बेलसर, माळशिरस, मावडी, पिंपरी, पिसर्वे, नायगाव, कोथळे, रानमळा, पांडेश्वर, रोमनवाडी अशा अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माजी राज्यमंत्री शिवतारे यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी असताना त्यांनी उपसा सिंचन (Lift Irrigation) योजनांचा वीजदर १ रुपया १६ पैसे प्रतियुनिट करून अवघ्या १९ टक्के दरात राज्यभरातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले होते.

Lift Irrigation
Tomato pests: मिरची, वांगी, टोमॅटोवरील किडींसाठी काय उपाय करावेत?

शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीची उर्वरित ८१ टक्के रक्कम शिवतारे यांनी राज्यातील कारखान्यांवर लादली होती. मात्र पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वीजदर १.१६ वरून ३ रुपये ६९ पैसे इतका वाढवला होता. जुन्या दराने शेतकऱ्यांना प्रति दशलक्ष घनफूट पाण्यासाठी साधारणतः १२ हजार रुपये खर्च येत होता. पण अचानक वीजदरात केलेल्या वाढीमुळे हा खर्च ३३ हजार रुपये प्रति दशलक्ष घनफूटपर्यंत गेला.

‘शेतकऱ्यांसाठी आनंददायी निर्णय’

वीजदर पूर्ववत केल्यानंतर पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रातील विशेषतः पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरण होते. याबाबत बोलताना वाघापूर येथील नितीन कुंजीर म्हणाले, ‘‘शिवतारे यांच्या मागणीला उचलून धरत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा या भागातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंददायी आहे. शिंदे सरकार हे खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आहे हेच यातून दिसून आले आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com