हिंगोलीची सुधारित हंगामी पैसेवारी ४८.२९, परभणीची ५२.६८ पैसे जाहीर

यंदाच्या (२०२२) खरीप हंगामातील पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आली.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

हिंगोली ः यंदाच्या (२०२२) खरीप हंगामातील (Kharip Season) पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आली. त्यानुसार हिंगोली (Hingoli) जिल्ह्याची सरासरी ४८.२९ पैसे तर परभणी जिल्ह्याची सुधारित हंगामी सरासरी ५२.६८ पैसे आहे.

सुधारित हंगामी पैसेवारी हिंगोली जिल्ह्याची ५० पैसेपेक्षा कमी तर परभणी जिल्ह्याची ५० पैसेपेक्षा जास्त आली आहे.

हिंगोली जिल्ह्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी...

हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावांमधील लागवडीयोग्य ३ लाख ९८ हजार ४२६ पैकी यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात ३ लाख ७६ हजार ७९७ हेक्टरवर पेरणी झाली.यंदा एकूण ७ हजार ७२९ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. सोमवारी (ता. ३१) जिल्हा प्रशासनातर्फे खरीप हंगामातील पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४८.२९ पैसे असल्याचे जाहीर करण्यात आले. १५ डिसेंबर रोजी खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर होईल.त्यानुसार ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांना दुष्काळग्रस्तांच्या सवलती लागू होतील.

Kharif Sowing
Crop Insurance : पीक पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली

परभणी जिल्ह्याची पैसेवारी ५० पेक्षा जास्त...

जिल्हाधिकारी आचंल गोयल यांनी सोमवारी (ता. ३१) परभणी जिल्ह्यातील ८३८ गावांची खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५२.६८ पैसे म्हणजेच ५० पैसेपेक्षा जास्त असल्याचे जाहीर केले.जिल्ह्यात लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ६१ हजार २०.७१ हेक्टर आहे. या वर्षीच्या खरिपात ५ लाख २२ हजार ५७४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण ३८ हजार ३५९ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. खरिपाची अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर होईल. त्यानुसार ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावात दुष्काळी स्थितीवर शिक्कामोर्तब होईल

खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका...गावांची संख्या...लागवडीयोग्य क्षेत्र...पेरणी क्षेत्र...पैसेवारी (पैसे)

हिंगोली...१५२...८२९५८...८२६२७....४९.०९

कळमनुरी...१४८...७७०१९...७४७२२...४८.३८

वसमत...१५२...७८९४०...६३७३३...४५.००

औंढा नागनाथ...१२२...६६७८८....६४१५५...४९.३०

सेनगाव...१३३...९२७२०...९१५६०...४९.६६

परभणी...१२८...१०१७१४....९८८९२...५३.००

जिंतूर...१६९...८६९०५...८५७२७...५२.३७

सेलू...९५...६५९५०....६१७३२...५२.५०

मानवत...५४...४५५५४...४२२४०...५३.२३

पाथरी...५८...५१०६९...३७३८०...५४.३२

सोनपेठ...५३...३५३०९...३३०३...५२.००

गंगाखेड...१०५...६२९४०...५८९६४...५१.३९

पालम...८२...४८८६७...४५६५०...५४.००

पूर्णा...९४...६३०७१...५८९६६...५१.२९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com