Rabbi Season : तालुक्यात रब्बी मशागतीची धांदल

शिरोळ तालुक्यात शेतकरी रब्बीच्या मशागतीत व्यग्र आहेत. तालुक्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला.
Rabbi Season
Rabbi SeasonAgrowon

जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात शेतकरी (Farmer) रब्बीच्या मशागतीत (Rabi Season) व्यग्र आहेत. तालुक्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला. हातातोंडाला आलेली पिके नष्ट झाली. सोयाबीन (Soybean), भुईमूग, कडधान्य, भाजीपाला, भात या पिकांची माती झाली. यातूनही न खचता शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मशागतीत गुंग आहेत.

Rabbi Season
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने केले असून नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान भरपाईची रक्कम तातडीने मिळाल्यास रब्बीच्या मशागतीला याचा फायदा होणार आहे. नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार कधी हे अद्याप अनिश्चित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज आणि हातउसण्यावरच पेरण्या कराव्या लागणार आहेत.

Rabbi Season
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

पावसाने शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर लगेचच शेती मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. सोयाबीन, भुईमूग पिके परतीच्या पावसाने गेल्याने सोयाबीन आणि भुईमुगाच्या दरात वाढ झाली आहे.

अतिवृष्टीतून वाचलेल्या माळरानातील पिकांवर ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव झाला. कीड नियंत्रणात आणण्यासाठी औषधांची फवारणी करावी लागली. याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन दिवाळीत अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही. नुकसानीचे पंचनामे झाले आता भरपाई कधी याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com