Weather Update : राज्यात किमान तापमानात वाढ

ढगाळ हवामान; औरंगाबाद, नगरमध्ये पावसाची हजेरी
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात आकाश ढगाळ (Cloudy) होत आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.

मंगळवारी (ता. २४) औरंगाबाद, नगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज (ता. २६) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

Weather Update
Weather Update : किमान तापमानात मोठी वाढ; थंडी गायब

पंजाब आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मध्य प्रदेश, राजस्थान, पश्‍चिम विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत (ता. २७) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

Weather Update
Weather Update : राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता

मंगळवारी (ता. २४) सायंकाळनंतर नगर जिल्ह्यातील सोनई, नेवासा, वांबोरी, राहुरी, कर्जत येथे पावसाच्या सरी पडल्या. लोहगाव (ता. नेवासा) तुरळक गारपीट झाली.

तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील दूधड, शेंदूरवादा, गोदावरी नदी काठच्या कायगाव (ता. गंगापूर) परिसरात, तसेच लिंबेजळगाव, लोहगाव व परिसरात पाऊस झाला, औरंगाबाद शहरात मेघगर्जनेसह तर ढोरकीन, बालानगर परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

बुधवारी (ता. २५) उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात वाढ झाली आहे.

राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका कमी अधिक होत आहे.बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा २६ ते ३४ अंशांच्या आसपास आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.


उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे. मंगळवारी (ता. २४) राजस्थानच्या बिकानेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २६) राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी थंडीची लाट येणार असून, पंजाब, हरियाना, उत्तर राजस्थान, आसाम, मेघालय, त्रिपुरा येथे धुके पडण्याचा अंदाज आहे.


बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३०.८ (१३.८), जळगाव २८.७ (१६.४), धुळे २७ (१०.२), कोल्हापूर २९.५ (१८.८), महाबळेश्‍वर २३.६ (१४.९), नाशिक २७.५

(१२.६), निफाड २८.४ (९.०), सांगली ३० (१९.४), सातारा ३१.३ (१८.२), सोलापूर ३२.६ (२०.९), सांताक्रूझ २६ (१५.६), डहाणू २३.२ (१६), रत्नागिरी २७.६ (१९.८), औरंगाबाद २९.४ (१३.२), नांदेड ३२.६ (१८.८), उस्मानाबाद - (१८.४), परभणी ३१.७ (१७.४), अकोला ३२.५ (१८.१),

अमरावती ३१ (१६.९), बुलडाणा ३०.२ (१६.३), ब्रह्मपुरी ३३.९ (१७), चंद्रपूर २९.२ (१६.८), गडचिरोली ३०.२ (१४.६), गोंदिया ३०.८ (१७), नागपूर ३१ (१६.३), वर्धा ३१.१ (१७), वाशीम ३१.८ (१५.४), यवतमाळ ३१.५ (१६.५).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com