भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमतीचा वाढता आलेख

पाकिस्तान व श्रीलंकेत पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल डिझेल आहे.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceAgrowon

नवी दिल्ली : भारतात पेट्रोल व डिझेलच्या (Petrol- Diesel Price) किंमती आकाशाला भिडल्या आहेत. सरकारी पेट्रोल कंपन्यांनी (Government Petrol Company) २२ मार्चपासून आतापर्यंत १५ वेळा इंधनाच्या दरात वाढ केली आहे. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पेट्रोलने १२२ रूपये लिटर असा उच्चांकी दर गाठला आहे. आपले शेजारी व सध्या राजकीय व आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तान (Pakistan) व श्रीलंकेत ((Srilanka) पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे, हे विशेष.

Petrol Diesel Price
पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धतेवरून शेतकऱ्यांची अडवणूक

जगभरातील इंधनाच्या (fuel Rate) दराचा आढावा घेणाऱ्या ‘globalpetrolprices.com’ या संकेतस्थळावरील (Website) माहितीनुसार पाकिस्तानमध्ये ४ एप्रिलला पेट्रोलची किंमत ६२.५२ रुपये प्रति लिटर होती. भारताच्या तुलनेत हा दर निम्म्याने कमी आहे. श्रीलंकेत अर्थव्यवस्थेचा (Sri lanka Economy) डोलारा खिळखिळा झाला असला तरी तेथे पेट्रोलची किंमत ७५.५३ रूपये लिटर आहे.

याशिवाय बांगलादेशात ७८.५३ रूपये, भूतानमध्ये ८६.२८, नेपाळला ९६.८० रुपये लिटरने पेट्रोलची विक्री होत आहे. या सर्व देशांपेक्षा आर्थिकदृष्ट्या बळकट असलेल्या चीनमध्ये पेट्रोल महाग आहे. तेथे लिटरमागे ११० रुपये मोजावे लागतात.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com