Monkeypox Update : मंकीपॉक्सचा धोका वाढतोय ः डब्ल्यूएचओ

मंकीपॉक्सचे सुमारे ५० हजार ४९६ रुग्ण आणि १६ मृत्यूंची नोंद यावर्षी झाल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. मंकीपॉक्स वाढता संसर्ग पाहता या जागतिक संघटनेने जुलैमध्ये जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती.
Monkeypox
MonkeypoxAgrowon

जीनिव्हा (वृत्तसंस्था) ः कोरोनानंतर (Corona) आता मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूजन्य आजाराचा धोका वाढू लागला आहे. जगभरात या आजाराची लागण झालेल्यांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बुधवारी (ता. ३१) जाहीर केले. युरोप वअमेरिकेत मात्र मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव (Monkeypox Outbreak) कमी होत आहे.

Monkeypox
Fruits, Vegetables: फळे, भाज्या टिकवण्यासाठी काय करावे?

मंकीपॉक्सचे सुमारे ५० हजार ४९६ रुग्ण आणि १६ मृत्यूंची नोंद यावर्षी झाल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. मंकीपॉक्स वाढता संसर्ग पाहता या जागतिक संघटनेने जुलैमध्ये जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. पत्रकार परिषदेत काल ‘डब्ल्यूएचओ’चे सरचिटणीस टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस म्हणाले, मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांपैकी निम्मे अमेरिकेतील आहे. अनेक देशांमध्ये या आजाराचा संसर्ग वाढत आहे. पण कॅनडात प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे, ही गोष्ट दिलासादायक आहे. जर्मनी, नेदरलँडसह काही युरोपिय देशांमध्येही मंकीपॉक्सच्यी संक्रमणाचा आलेख उतरणीला लागला आहे. या साथीचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम करणे आणि समूहाला त्या सामावून घेण्याचे उपाय प्रभावी ठरल्याचे यातून दिसून येते.

मंकीपॉक्सच्या उच्चाटनासाठी सुरुवातीपासूनच्या पुराव्यांचा आढावा घेणे, राजकीय इच्छाशक्ती आणि कटिबद्धता आणि ज्या समुदायांना सर्वांत जास्त गरज आहे, तेथे सार्वजनिक आरोग्य उपायांची अंमलबजावणी करणे, या तीन गोष्टींची गरज आहे. आपल्याला मंकीपॉक्ससह जगण्याची गरज नाही.
टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस, सरचिटणीस, डब्ल्यूएचओ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com