Boll Worm : गुलाबी बोंडअळी परतण्याचा धोका

गेल्या वर्षी कापसाला चांगला दर असल्याने उशिरापर्यंत कापूस शेतात होता. जिनिंगमध्ये बरेच दिवस कापूस होता. त्यामुळे बोंडअळी परतण्याचा धोका आहे.
Boll Worm
Boll WormAgrowon

यवतमाळ : गेल्या वर्षी कापसाला चांगला दर (Cotton Rate) असल्याने उशिरापर्यंत कापूस (Cotton) शेतात होता. जिनिंगमध्ये बरेच दिवस कापूस होता. त्यामुळे बोंडअळी (Cotton Boll Worm) परतण्याचा धोका आहे. येणाऱ्या काळात पतंग रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास पुन्हा बोंडअळीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Boll Worm
Cotton : साठ गावांत ‘एक गाव एक वाण’

शेती आणि शेतकरी अडथळ्याची शर्यत नेहमीच पार करीत आला आहे. मात्र, यानंतरही संकटाने शेतकऱ्यांचा पाठलाग सोडलेला नाही. गेल्या पाच वर्षांत तर अनेक संकटात शेतकरी सापडला. यातूनही पुन्हा उभारी शेतकऱ्यांनी घेतली आहे. नैसर्गिक संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर गेल्या फवारणीतून विषबाधा, गुलाबी बोंडअळी असे संकट घोंघावत आहे. २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांना हवालदील केले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे त्याला ‘ब्रेक’लागला. बोंडअळी तयार होण्याची साखळी खंडित करण्यात आली होती. मात्र, गेल्यावर्षी कापसाला चांगले दर मिळाले.

Boll Worm
Pink Boll Worm : गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी `मेटिंग डिर्स्टबन्स’ तंत्र

परिणामी अनेक शेतकऱ्यांनी उशिरापर्यंत कापूस पीक घेतले. कापूस येत असल्याने जिनिंमध्येही कापूस मोठ्या प्रमाणात होता. परिणामी, बोंडअळीचा जीवनक्रम खंडित झाला नाही. त्यामुळे, यंदा गुलाबी बोंडअळी परतण्याचा धोका वाढला आहे. येणाऱ्या हंगामासाठी आतापासून योग्य काळजी न घेतल्यास पुन्हा एकदा बोंडअळीचे आक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिनिंगमध्ये कामगंध सापळे किंवा लाइट ट्रॅप लावणे आवश्यक आहे. मात्र, अजूनही या बाबींची खबरदारी घेण्यात आलेली नाही.

परिणामी, पतंग तयार झाल्यानंतर त्याला ब्रेक लावण्यात यश आले नाही तर, ते अंडी तयार घालण्याची भीती आहे. त्यामुळे बोंडअळी पुन्हा परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दोन वर्षांत शासनाने यासाठी खबरदारी घेतली होती. बियाण्यांची विक्री, पेरणीचा कालावधी निश्‍चित करून दिला होता. यंदा प्रशासनाने बोंडअळीबाबत योग्य त्या उपाययोजना न केल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या वर्षी कापसाला चांगला दर मिळाला असल्याने उशिरापर्यंत कापूस शेतकऱ्यांच्या घरात तसेच जिनिंगमध्ये होता. येणाऱ्या काळात पतंग तयार होण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, यापूर्वीच त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जिनिंगमध्ये कामगंध सापळे तसेच लाइट ट्रॅप आवश्यक आहे. याठिकाणी काळजी न घेतल्यास अडचणी वाढण्याची भीती आहे.

-डॉ. प्रमोद यादगीरवार,

वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ तथा सहयोगी संचालक,

विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com