Sugarcane Transport : खुलताबादमध्ये ट्रॉलीमधून धोकादायक ऊस वाहतूक

वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक होत आहे.
Sugarcane Transport
Sugarcane TransportAgrowon

खुलताबाद, जि. औरंगाबाद ः साखर कारखान्यांचा गळीत हंगाम (Sugarcane Season) सुरु झाला असून त्यासाठी ऊस वाहतूक (Sugarcane Transport) देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मात्र, धोकादायक पद्धतीने ट्रॅक्टरला ट्रॉली जोडणीमधून बेकायदेशीर पद्धतीने ऊस वाहतूक (Risky Sugarcane Transport) करण्यात येत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.

Sugarcane Transport
Sugarcane Transport : रिफ्लेक्टरविना ऊस वाहतूक आढळल्यास तक्रार करावी

Sugarcane Transportवाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक होत आहे.

रुंद रस्त्यावर तर या ट्रॅक्टर ट्रॉल्यांपासून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. एका ट्रॅक्टरला दोन दोन ट्रॉल्या जोडून ट्रॅक्टर ट्रॉल्यांना कुठल्याही प्रकारे वाहतूक नियमाप्रमाणे बनविलेले नाही.

Sugarcane Transport
Sugarcane Transport : इंदापूर शहरातून धोकादायक ऊस वाहतूक

त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक करणारे चालक ट्रॅक्टरमध्ये मोठे मोठे लाऊड स्पीकर्स लावून मोठ्या आवाजात गाणे आणि संगीत लावून वाहन चालवीत असल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या अशा प्रकारामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांची फसगत होते. रात्रीच्या वेळी ट्रॉलीला मागील बाजूने लाइट नसतो. काही रिफ्लेक्टर लावलेले नसल्याने रात्री वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला आहे.

ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात उसाची वाहतूक होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com