बिहारमध्ये राजकीय भूकंप: जेडीयूची एनडीएमधून एक्झिट

पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांनी आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडावे, या निर्णयाबाबत सहमती व्यक्त केली असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले.
Nitishkumar & Narendra Modi
Nitishkumar & Narendra ModiAgrowon

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (JDU) भाजपासोबत फारकत घेतली. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी आज राज्यपाल फग्गु चौहान यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला. दरम्यान राज्यात नव्याने सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

राज्यपाल फग्गु चौहान यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवल्यानंतर संयुक्त जनता दलाचे (JDU) प्रमुख नितीशकुमार यांनाही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांनी आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडावे, या निर्णयाबाबत सहमती व्यक्त केली असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले. या निर्णयाबाबत सर्वांची सहमती आल्यावरच आपण राजभवनात येऊन आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचेही ते म्हणाले.

Nitishkumar & Narendra Modi
Maharashtra Cabinet :अखेर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार : १८ मंत्र्यांनी घेतली शपथ

दरम्यान आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीशकुमर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी गेले. त्यामुळे राज्यात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या समर्थनावर नवे सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये सध्या सुरू असलेला राजकीय गोंधळ आणि विविध पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान नव्या सरकारची तयारी जवळपास पूर्ण झाली. ताज्या माहितीनुसार, काँग्रेस-डाव्या पक्षांनी आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तेजस्वी यादव यांना सुपूर्द केले आहे. पाटणा येथील राबडीदेवी यांच्या निवासस्थानी झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत तेजस्वी यांना हे समर्थन पत्र देण्यात आले.

बिहारमध्ये पुन्हा एकदा 'महागठबंधन'

नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडली आहे. त्यामुळे आता नव्या सरकारस्थापनेसाठी आम्ही आमचे समर्थन त्यांना देणार असल्याचे बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन सिंग यांनी स्पष्ट केले. बिहारमध्ये पुन्हा एकदा महागठबंधन होणार असून नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार आहे. काँग्रेसच्या १९ आमदारांच्या समर्थनाचे एक पत्रही आम्ही राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांच्याकडे दिल्याचेही सिंग यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com