Rohit Pawar : नुकसान भरपाईसाठी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Crop Damage Compensation : विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीने या भागातील शेतकऱ्यांना ग्रासले असून, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या सततच्या व अवकाळी पावसामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
Rohit Pawar
Rohit PawarAgrowon

Nagar News : कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके अवर्षणप्रवण भागातील असून, या भागात शेतकऱ्यांनी फळबागा फुलविल्या आहेत. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीने या भागातील शेतकऱ्यांना ग्रासले असून, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या सततच्या व अवकाळी पावसामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

त्यामध्ये कर्जत तालुक्याचे चाळीस कोटी, तर जामखेड तालुक्याचे बावीस कोटी, असा एकूण बासष्ट कोटी रुपयांचा निधी प्रलंबित आहे, याबाबत आमदार रोहित पवार यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

अति पाऊस व अन्य नैसर्गिक कारणाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी मिळणारी ही आर्थिक मदत अद्यापही त्यांना मिळालेली नाही. याबाबत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रलंबित निधी मिळावा यासाठी विनंती केली आहे.

Rohit Pawar
Rohit Pawar : कर्जत-जामखेडमधील विकासकामांची स्थगिती हटविली

त्याचबरोबर मार्च, एप्रिल व मे २०२३ दरम्यान गारपीट व वादळी पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचा निधी देखील शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे सध्या मतदारसंघातील शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे.

अशातच अल- निनोच्या प्रभावामुळे येणाऱ्या जून, जुलै व ऑगस्ट दरम्यानच्या पर्जन्यात घट होऊन टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

Rohit Pawar
MLA Rohit Pawar : रोहित पवार साधणार पाच लाख युवकांशी संवाद

अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कर्जत व जामखेड तालुक्यातील फळबागांची दुरवस्था होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्या अनुषंगाने दुष्काळी परिस्थितीत फळबागा जगवण्यासाठी योग्य नियोजन व उपाययोजना शासनाकडून करण्याची गरज आहे, असेही रोहित पवार म्हटले आहे.

ऑक्टोबर-२२ अखेरीस झालेल्या पावसाची नुकसान भरपाई ही मार्च-२३ महिन्याच्या अखेरीस वितरित केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सांगितले होते. परंतु शेतकऱ्यांना अजूनपर्यंत ती मदत मिळालेली नाही. त्यामध्ये नगर जिल्ह्याचे ७०० हून अधिक कोटी व कर्जत-जामखेड तालुक्याचे ६२ कोटी रुपये आहेत.

हे लवकरात लवकर द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना भेटून केली. ज्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यासोबतच फळबागा व जनावरांसाठी जर पाऊस कमी झाला तर त्याचे योग्य नियोजन करण्याचीही विनंती त्यांना या वेळी भेटून केली.

- रोहित पवार, आमदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com