
पुणे : महाराष्ट्र सरकारने २००२ पासून नवीन सहकारी साखर कारखान्यांना (New Co-operative Sugar Factory) बँकेत खाते उघडण्यास परवानगी बंद केली आहे. नवीन सहकारी साखर कारखान्यांची नोंदणी बंद केली आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत आलेल्या सरकारने नवीन सहकारी साखर कारखान्यांना (New Co-operative Sugar Factory) त्यांची नोंदणी पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव खामकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknth Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्याकडे केली.
निवेदनानुसार, भारतीय राज्य घटनेने (Indian Constitution) लोक कल्याणकारी राज्याची (Welfare State) संकल्पना स्वीकारली आहे. जनतेच्या सहभागाचा आधार घेऊन सामाजिक विषमता दूर करणारी परिवर्तनीय व उत्कर्ष घडवून आणणारी ही व्यवस्था आहे. कल्याणकारी राज्यासाठी समाजाच्या कल्याणासाठी सहकारी संस्थांमुळे समाजातील दुर्बल घटकांना स्वतःचा आर्थिक विकास करता येतो.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, आर्थिक दुर्बल घटकांना नवीन तंत्रज्ञान त्याचे आधुनिकीकरण व उद्योगांना प्रोत्साहन देता येते. सहकाराचा कल्याणकारी हेतू सहकारातर्फे सफल होतो व समाजाचा आर्थिक विकास होतो. आर्थिक लोकशाही सहकारामार्फत यशस्वी होऊ शकते.
सहकार हे राज्याचे वैभव असून राज्य समृध्द होण्यामध्ये सहकाराचा सिंहाचा वाटा आहे. तरी नवीन सहकारी साखर कारखान्यांना बँकेत खाते उघडण्यास व नोंदणी करण्याची परवानगी देण्याबाबत प्राधान्याने निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.