Irrigation : कुकडी, घोड कालव्याचे आवर्तन एक व दहा जानेवारीपासून

कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पार पडली.
Irrigation
IrrigationAgrowon

पुणे : कुकडी प्रकल्प (Kukadi Project) व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पार पडली. कुकडी डाव्या कालव्याचे रब्बीमधील (Rabi Irrigation) आवर्तन १ जानेवारी २०२३ रोजी, तर घोड डावा व उजव्या कालव्याचे पहिले आवर्तन १० जानेवारी २०२३ रोजी सोडण्याचे निश्‍चित करण्यात आले.

Irrigation
Irrigation : नेरधामना पूर्णा बॅरेजच्या कामासाठी जनआंदोलनाचा इशारा

या वेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोषकुमार सांगळे आदी उपस्थित होते.

Irrigation
Irrigation Scheme : कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर योजनेला मिळणार सुधारित मान्यता

डिंभे बोगद्याच्या कामासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्यानुसार तातडीने या कामाचे प्रस्ताव देण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील आणि श्री. विखे- पाटील यांनी दिले. धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे म्हणून गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात.

नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण आणावे. या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे, सूचना या वेळी मंत्र्यांनी दिल्या. डिंभे डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी बिगरसिंचनामधून ३० कोटी खर्चून काम करण्यात आले आहे. या वर्षी अजून ३० कोटी खर्च करण्याचे नियोजन असल्याचे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी सांगितले.

रब्बीत कुकडी डाव्या कालव्याचे एक, तर घोड कालव्यातून दोन आवर्तने :

कुकडी डावा कालव्याचे सुरू असलेल्या रब्बी हंगामात एक आवर्तन आणि उन्हाळी एक आवर्तन देण्यात येणार असून, पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उन्हाळी हंगामाच्या दुसऱ्या आवर्तनाबाबत बैठक घेण्याचेही या वेळी ठरले.

माणिकडोह धरणातून येडगाव धरणासाठी कुकडी नदीद्वारे, पिंपळगाव जोगे डावा कालवा, डिंभे उजवा कालवा, डिंभे डावा कालवा, घोड शाखा कालवा, मीना शाखा कालवा, मीना पूरक कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजनही या वेळी निश्‍चित करण्यात आले. घोड डावा व उजव्या कालव्याची रब्बीची दोन आवर्तने सोडण्याचे निश्‍चित करण्यात आले. रब्बी हंगामानंतर पाणीसाठा उन्हाळी आवर्तनाबाबत बैठक घेण्यात येईल, असेही या वेळी सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com