Onion Rate Crisis : दोन एकर कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर

कांदा उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लेट खरीप रांगडा व रब्बी उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे. दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी कांदा पिकात अधिक मेहनत व उत्पादन खर्च झाला.
Onion Crop
Onion CropAgrowon

Onion Rate Crisis नाशिक : दरवर्षीच्या तुलनेत यंदाही खरीप हंगामात पर्जन्यमान चांगले झाल्याने कांदा उत्पादक (Onion Farmer) शेतकऱ्यांनी लेट खरीप व उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड (Onion Cultivation) केली.

मात्र कांद्याचे सध्याचे कोसळलेले बाजार भाव (Onion Market Rate) व होणारा प्रचंड खर्च पाहता नैताळे येथील तरुण शेतकरी सुनील बोरगुडे यांनी दोन एकर लेट खरीप कांद्याच्या शेतावर वैतागून अक्षरशः रोटाव्हेटर फिरविला. यामुळे शासनाच्या धोरणावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

कांदा उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लेट खरीप रांगडा व रब्बी उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे. दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी कांदा पिकात अधिक मेहनत व उत्पादन खर्च झाला.

मात्र कांद्याचे बाजारभाव प्रचंड कोसळले आहेत. उत्पादन खर्च मात्र खूप झाला आहे. सध्या शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

Onion Crop
Onion Rate Crisis : हतबल शेतकऱ्याकडून चार एकर कांदा मोफत

सुनील बोरगुडे यांनी कसेबसे विद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळत नसल्यामुळे शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रांगड्या कांद्याची दोन एकर लागवड केली. त्यासाठी रोप, लागवड व पीक संरक्षण खर्च केला. कांद्याचे बाजारभाव व खर्च याचा कुठेच ताळमेळ बसेना.

Onion Crop
Onion Rate : केंद्र, राज्य सरकार शेतकऱ्यांची चेष्टा चालवली

शेवटी दर्जेदार कांद्यावर रोटाव्हेटर फिरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे करत असताना कांदा उत्पादकांच्या मनाला फार मोठे चटके बसत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शासनाच्या कायमच शेतकरीविरोधी धोरणाचा वीट आला आहे. पर्याय नाही म्हणून शेती व्यवसाय करावा लागत आहे. मेहनत, भांडवल खर्च करून तोटाच होत असल्याने दोन एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरविण्याचा निर्णय घेतला.

- सुनील बोरगुडे, कांदा उत्पादक, नैताळे, जि. नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com