Maize : दोन एकर उभ्या मक्यावर फिरवला रोटाव्हेटर

शेळके यांचे ५ एकर क्षेत्र आहे. त्यापैकी २ एकर क्षेत्रावर त्यांनी मका लागवड केली होती. एकीकडे भाव नसल्याने शेतकऱ्याने उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवला. अखेर हाती भांडवल नसल्याने बियाणे व खतांसाठी उसनवार करून ३५ हजार रुपये लागवडीसाठी खर्च केले.
Maize
MaizeAgrowon

नाशिक : चालू वर्षी खरीप हंगामात (Kharif Season) प्रतिकूल हवामान, संततधार पाऊस व लष्करी अळीच्या (Armyworm On Maize) प्रादुर्भावाचा फटका मका पिकाला (Maize Crop) बसला आहे. मक्याची लागवड (Maize Cultivation) करून दोन महिने होत आले, तरी पिकाची वाढ न झाल्याने मेहनत व खर्च करून वाया गेले. अखेर नुकसान न सोसल्याने येवला तालुक्यातील ठाणगाव येथील शेतकरी प्रवीण शेळके यांनी दोन एकर उभ्या मका पिकावर रोटाव्हेटर (Rotavator rotated on maize Crop) फिरवला आहे.

Maize
Maize Armyworm: बांगलादेशात लष्करी अळीसाठी मित्रकिटकांवर भिस्त

शेळके यांचे ५ एकर क्षेत्र आहे. त्यापैकी २ एकर क्षेत्रावर त्यांनी मका लागवड केली होती. एकीकडे भाव नसल्याने शेतकऱ्याने उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवला. अखेर हाती भांडवल नसल्याने बियाणे व खतांसाठी उसनवार करून ३५ हजार रुपये लागवडीसाठी खर्च केले. बियाणे दरवाढ, मजुरी खर्चात वाढ अशा परिस्थितीत १८ जूनदरम्यान लागवड केली होती. दोन महिने होत आले. मात्र खतांची मात्रा देऊनही पिकाची जोमदार वाढ नव्हती. पीक रोगग्रस्त होऊन वाढ खुंटल्याने ते नावापुरतेच शेतात उभे होते.

Maize
Maize : युक्रेनमधील बंदरे खुली; २६ हजार टन मका लेबनॉनला रवाना

जुलै महिन्यांत झालेल्या संततधार पावसामुळे मका पीक क्षेत्रात शेत उफळले. तर नंतर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतात तण मोठ्या प्रमाणावर उगवून आले. या परिस्थितीत शेळके यांनी तण नियंत्रण करण्यासाठी निंदणी केली. या शिवाय खते देण्यासह लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्याही केल्या होत्या. मात्र तरीही पीक पूर्णपणे खराब झाल्याने फक्त शेतात उभे असल्याचे दिसून येत होते. हे पीक जनावराच्या चाऱ्यायोग्यही नसल्याने त्यांना नैराश्य आले. अखेर त्यांनी पिकावर रोटाव्हेटर फिरवला.

दोन महिने लागवडीला होऊनही पिकात सुधारणा होत नसल्याने अखेर पीक काळे पडले. त्यामुळे रोटाव्हेटरने उभे पीक मोडले आहे. हवामान बदल व सततचा पाऊस यामुळे पिकाचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची हीच स्थिती आहे.
प्रवीण शेळके, नुकसानग्रस्त शेतकरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com