‘रोव्हर’मुळे जमीन मोजणीला मिळेल गती

रोव्हर यंत्र उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या सिग्नलद्वारे मोजणी करावयाच्या पॉइंटचे अक्षांश व रेखांश दर्शविते व त्या अक्षांश-रेखांश वरून ऑटोकॅडसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून मोजणीची पुढील प्रक्रिया केली जाते.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

पुणे ः रोव्हर यंत्र उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या सिग्नलद्वारे मोजणी करावयाच्या पॉइंटचे अक्षांश व रेखांश दर्शविते व त्या अक्षांश-रेखांश वरून ऑटोकॅडसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून मोजणीची पुढील प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या आधुनिक मोजणी साहित्यातून मोजणीकाम सुलभ, अचूक व अत्यंत जलदगतीने होऊन, याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. तसेच जमीन मोजणीचे वाददेखील संपुष्टात येतील असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास जमीन मोजणीसाठीच्या अत्याधुनिक ३५ रोव्हर युनिट व २ प्लॉटरचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप व कार्यान्वयन जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (ता.१) आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

या वेळी मंत्री पवार म्हणाले,‘‘जमीन वाद विवाद आणि मोजणीमध्ये क्लिष्टता होती. आता उपग्रहाद्वारे होणाऱ्या मोजणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा आणि जलदसेवा मिळणार आहे. यापूर्वीचे मोजणी साहित्य प्लेन टेबलने साधारण १० एकर मोजणी करण्यासाठी १ दिवस वेळ लागत असे. तसेच, ईटीएस यंत्राच्या साह्याने तेवढ्याच क्षेत्राच्या मोजणीसाठी ३ ते ४ तासांचा कालावधी लागत होता. आता सुमारे ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तेवढी मोजणी शक्य होईल.’’

या प्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या २०२०-२०२१ या आर्थिक नियोजन वर्षातील नावीन्यपूर्ण योजनेतून एकूण २ कोटी ९९ लाख रुपये रोव्हर युनिट व प्लॉटर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. १ रोव्हर युनिटची किंमत अंदाजे ८ लक्ष ३० हजार रुपये, तर प्लॉटरची किंमत अंदाजे ४ लक्ष ५० हजार रुपये इतकी आहे. त्यातून ३५ रोव्हर व २ प्लॉटर खरेदी करण्यात आले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com