Nira Canal : नीरा देवघरच्या अस्तरीकरणासाठी २१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर

नीरा देवघर धरण प्रकल्पातील उजव्या कालव्याचे दहा किलोमीटरच्या अंतरातील अस्तरीकरणाचे काम मागील दोन वर्षांत पूर्ण करण्यात आले होते.
Nira Canal
Nira CanalAgrowon

Agriculture Irrigation News भोर, जि. पुणे : भोर तालुक्यातील नीरा- देवघर धरणाच्या (Nira Devghar Dam) उजव्या कालव्याचे (Nira Canal) ५५ किलोमीटरचे अस्तरीकरणाचे (Canal Lining) काम दोन वर्षांपासून निधीअभावी रखडले होते.

या कामासाठी १८६ कोटी, तर डावा कालवा बंद सुधारित अंदाजपत्रकास २८.७६ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.

Nira Canal
Solapur Ujani Canal : कालवा फुटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

या कामासाठी निधी मंजूर करावा यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासमवेत पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी पाठपुरावा केला होता.

Nira Canal
Canal Linkage Project : देशातील पहिला कॅनॉल जोड प्रकल्प साकारणार

नीरा देवघर धरण प्रकल्पातील उजव्या कालव्याचे दहा किलोमीटरच्या अंतरातील अस्तरीकरणाचे काम मागील दोन वर्षांत पूर्ण करण्यात आले होते.

पुढील सांगवी ते वडगावपर्यंतच्या उर्वरित कामासाठी निधी मंजूर झाल्याने या कालाव्याच्या अस्तरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

कालव्याच्या अस्तरीकरणामुळे पाणी गळती थांबणार आहे. याबरोबरच लाखो लिटर वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होऊन पाणी गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांची नापीक झालेली शेतजमीन पीक घेण्यायोग्य होणार असल्याने कालवा परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com