Farm Mechanization
Farm MechanizationAgrowon

Farm Mechanization : यंत्र खरेदीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात चार कोटींचा निधी वितरित

यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध प्रकारच्या शेतीतील यंत्र खरेदीसाठी कृषी विभागाकडून ४ कोटी ३ लाख ६३ हजारांचा निधी लाभार्थींच्या खाती वर्ग करण्यात आला.

रत्नागिरी : वाढती महागाई, शेतीचा खर्च वाढत असल्यामुळे शेतीत यांत्रिकीकरणाकडील ओढा वाढला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध प्रकारच्या शेतीतील यंत्र खरेदीसाठी कृषी विभागाकडून ४ कोटी ३ लाख ६३ हजारांचा निधी लाभार्थींच्या खाती वर्ग करण्यात आला.

Farm Mechanization
कृषी यंत्र खरेदीसाठी सरकारचे अनुदान

शेतकऱ्यांना माफक दरात भाडे तत्त्वावर औजारे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी अवजारे बँक उपलब्ध आहेत. या योजनेचा ऑनलाईन लाभ घेता येणार आहे. यासाठी महाबिडी संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी नोंदणी करवायची असते. जिल्ह्यात कृषी क्षेत्रामध्ये कृषी यांत्रिकीकरण महत्त्वाचे वाढत असल्याने यंत्र खरेदी योजनाना महत्व दिले जात आहे. दिवसेंदिवस शेतीकामांकरिता मजुरांची कमतरता भासत आहे. त्याप्रमाणे औद्योगिकीकरण, नागरिकीकरण तसेच कृषी क्षेत्रात मजूर उपलब्ध होत नाहीत.

Farm Mechanization
घरी चार ट्रॅक्टर, यंत्र; पण सारी कामे बैलांनीच

कोकणात चिखळणी, उखळणी, लागवड, फवारणी व काढणीसह सर्व प्रकारच्या कामाकरिता यंत्रे उपलब्ध आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण तसेच राष्ट्रीय कृषी योजना कृषी यांत्रिकीकरणअंतर्गत वैयक्तिक कृषी अवजारे, कृषी अवजारे बँक स्थापनेकरिता शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य केले जाते. जिल्ह्यासाठी २०२२-२३ करिता कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेंतर्गत १ कोटी ५९ लाख ८० हजार, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरणअंतर्गत १ कोटी ६० लाख ३६ हजार व राष्ट्रीय कृषी योजना कृषी यांत्रिकिकरणअंतर्गत १ कोटी ३ लाख ५६ हजार, असा ४ कोटी २१ लाख २५ हजार निधी प्रस्तावित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com