Cotton Market : खानदेशात कापसाला ९१०० रुपये दर

खेडा खरेदी रखडत सुरु
 Cotton Market
Cotton MarketAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः कापसाला मागणी वाढू लागल्याने खेडा किंवा थेट खरेदीत कापसाला व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या दरातही वाढ झाली आहे. पण खेडा खरेदी रखडत सुरू आहे. मध्यंतरी ८००० ते ८ हजार ५०० दर होता. कापूस दरात (Cottan Rate) काही दिवसांत सुधारणा झालेली दिसत असून, दर ९ हजार १०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

 Cotton Market
Cotton Market : कापसाचे दर आणखी वाढतील का?

शेतकरी अधिक संख्यने कापूस विक्रीस तयार नाहीत. दिवाळीनंतर बाजारात दर सुधारतील, असे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार दरात सुधारणा झाली आहे. कोरडवाहू कापूस पिकात पहिली वेचणी सुरू आहे. पूर्वहंगामी कापूस पिकातून ८० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आतापर्यंत आला आहे. फरदड कापूस पीक घेण्याची स्थिती नाही. कारण पिकाची वाढ, स्थिती बरी नाही. यामुळे क्षेत्र रिकामे केले जात आहे. यातच कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. कारण कापूस पीक परवडणारे नाही. त्याचा खर्च वाढला आहे. वेचणीला मजूर मिळत नाहीत. वेचणीसाठी १० ते १२ रुपये प्रति किलोचा खर्च येत आहे.

 Cotton Market
Cotton Market : कापूस दरात सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खानदेशातील कापसाच्या गाठींना मागणी वाढली आहे. दर्जेदार रुईची निर्मिती खानदेशातील कारखानदार करीत आहेत. त्याचे दर गुजरातमधील रुईच्या तुलनेत अधिक आहेत. तसेच खंडीचा (एक खंडी म्हणजे ३५६ किलो रुई) दर ६५ हजारांवरून ८५ हजारांपर्यंत पोहोचला आहे. काही जिनिंग प्रेसिंग कारखाने १०० टक्के क्षमतेने काम करीत आहेत. यामुळे कापसाची गरज आहे. पण सर्वच कारखाने सुरू नाहीत. गुजरातमधून खानदेशातील कापसाची सध्या उचल नाही. यामुळे खेडा खरेदी रखडत सुरू आहे.


‘अॅग्रोवन’चे भाकीत खरे ठरले
या हंगामात कापूस दरात नोव्हेंबरमध्ये सुधारणा होईल, असे भाकित १८ सप्टेंबर २०२२ रोजी जळगाव शहरानजीक जैन हिल्सवर आयोजित कापूस व्यापार बैठकीत नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशनचे माजी अध्यक्ष महेश शारदा यांनी केले होते. हा अंदाज खरा ठरल्याचे दिसत आहे. अर्थात कापूस उत्पादकांनाही ‘अॅग्रोवन’मधून प्राप्त झालेल्या बाजारविषयक माहितीचा लाभ होत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com