Run for Unity : राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृंद्धीगत होण्यासाठीच ‘रन फॉर युनिटी’

नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धींगत व्हावी यासाठी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन केले. सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला ही आनंदाची बाब, असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी उद्घाटन प्रसंगी विभागीय क्रीडा संकुल येथे व्यक्त केले.
Run For Unity
Run For UnityAgrowon

औरंगाबाद : नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची (National Unity) भावना वृद्धींगत व्हावी यासाठी ‘रन फॉर युनिटी’चे ()Run For Unity आयोजन केले. सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला ही आनंदाची बाब, असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी उद्घाटन प्रसंगी विभागीय क्रीडा संकुल येथे व्यक्त केले.

Run For Unity
Agriculture Machinery : कृषी अवजारांवर होतेय सातत्यपूर्ण संशोधन

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ,पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातील अधिकारी, विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यामध्ये उस्फूर्त सहभागी झाले होते.

Run For Unity
Agriculture Drone : शासन ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १३ महिन्यांनी मराठवाडा स्वतंत्र झाला आणि निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील करण्यात आला. एकसंघ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निजामाच्या विरोधात पोलिस ॲक्शन करण्यात आली, ‘‘एक भारत, श्रेष्ठ भारत’’ साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. जाती, धर्म, भाषा, हे वेगवेगळे असले तरी एकसंघतेच्या भावनेने ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन जिल्हा प्रशासनाने आयोजित केल्याबद्दल डॉ. कराड यांनी आभार व्यक्त केले.

या रॅलीचे आयोजन विभागीय क्रीडा संकुलापासून सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर, पुन्हा याच मार्गाने विभागीय क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. प्रथम राष्ट्रगीत गायन झाले. त्यानंतर मशाल हातात घेऊन डॉ. कराड यांनी ‘रन फॉर युनिटीच्या’ रॅलीत सहभाग घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com