रशिया करतोय अन्नधान्याचा शस्त्र म्हणून वापर : ब्लिंकन

अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत ब्लिंकन यांनी युक्रेन-रशिया युद्धामुळे होत असलेल्या नुकसानीचा पाढा वाचला.
रशिया करतोय अन्नधान्याचा शस्त्र म्हणून वापर : ब्लिंकन
Antony BlinkenAgrowon

न्यू यॉर्क : रशियाने युक्रेनमधील आपला हेतू साध्य करण्याच्या हट्टापायी जगातील लाखो लोकांना उपयुक्त ठरू शकणारे धान्य बळजबरीने स्वत:च्या ताब्यात ठेवत या अन्नधान्याचा शस्त्र म्हणून वापर सुरू केला आहे, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आज केला.

अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत ब्लिंकन यांनी युक्रेन-रशिया युद्धामुळे होत असलेल्या नुकसानीचा पाढा वाचला.

ते म्हणाले, ‘युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारा अन्नधान्याचा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे युक्रेनमधून अनेक देशांमध्ये होणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबला असून, अन्नपुरवठा साखळीवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. रशियाने अन्नधान्याचा शस्त्र म्हणून वापर सुरू केला आहे. यामुळे जगात अनेक ठिकाणी भुकेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.’

अझोव्ह आणि काळ्या समुद्रात रशियाने आपल्या युद्धनौका तैनात करून तेथून युक्रेनवर हल्ले केले जात असल्याने या सागरी मार्गांवरून होणारा व्यापार थांबला आहे. परिणामी, युक्रेनच्या गोदामांमध्ये दोन कोटी टन अन्नधान्य निर्यातीविना पडून आहे.

आरोप फेटाळला


अमेरिकेच्या आरोपाचा रशियाने इन्कार केला. ‘सर्वांची उपासमार करण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचा आरोप चुकीचा आहे. केवळ अमेरिका आणि युक्रेनलाच लोकांच्या जिवाची काळजी आहे, असे नाही,’ असे रशियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत व्हॅसिली नेबेन्झिया म्हणाले. रशियाने नाही, तर युक्रेननेच १७ देशांची ७५ जहाजे अडकवून ठेवली आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com