Sadabhau Khot : शेतकऱ्याला तब्बल ४० हजारांचा दंड, टेम्पोही केला जप्त ; सदाभाऊ खोत यांचं पालिकेसमोरच कांदे विकत आंदोलन

एकीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी 'विकेल ते पिकेल' अशी धोरणं राबवत आहे, मात्र, सरकारी अधिकारीच सरकारच्या या धोरणाला हरताळ फासताना दिसत आहेत.
Sadabhu Khot
Sadabhu Khot Agrowon

Pune News : एकीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी 'विकेल ते पिकेल' अशी धोरणं (Agriculture Policy) राबवत आहे, मात्र, सरकारी अधिकारीच सरकारच्या या धोरणाला हरताळ फासताना दिसत आहेत. रस्त्याच्या बाजूला कांदा विक्री (Onion Sale) करणाऱ्या शेतकऱ्यावर पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

ही कारवाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याचा टेम्पो जप्त करून तब्बल ४० हजारांचा दंड वसूल केला. या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सोमवारी (ता. १७) महापालिकेच्या दारात कांदा विक्री करत आंदोलन केले.

कोरोना महामारी तसेच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळे आधीच राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे.

बाजारात व्यापारी मालांची किंमत करत नाही म्हणून शेतकरी स्वत:च शहरात शेत मालाची विक्री करून चार पैसे पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

एकीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी 'विकेल ते पिकेल' अशा योजना राबवत आहे. मात्र, सरकारी अधिकारीच सरकारच्या या धोरणांना हरताळ फासत आहेत.

Sadabhu Khot
Onion Subsidy : कांदा अनुदानाच्या अर्जांसाठी शेतकऱ्यांची वाढली गर्दी

कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तावडी येथील रमेश आरगडे हा शेतकऱ्याने पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे रस्त्याच्या बाजूला टेम्पो लावून कांदा विक्री करत होता.

मात्र, पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त महादेव कदम यांनी आरगडे यांचा टेम्पो जप्त करत त्यांना ४० हजारांचा दंड ठोठावला.

Sadabhu Khot
Onion Verity : ‘एनएचआरडीएफ-फुरसुंगी’लाल कांद्याचा वाण विकसित

दरम्यान, गल्लोगल्ली दलाल ठेवून अनधिकृत पैसे गोळा करणाऱ्या अशा मग्रूर अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी खोत यांनी केली. तसेच संबंधित शेतकऱ्यावर कोणतीही कारवाई न करता त्याचा शेतीमाल व टेम्पो त्वरित सोडून देण्यात यावा.

तसेच कोणतीही कारवाई न करता दंडही आकारू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शहरात शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवरील कारवाया न थांबल्यास राज्यभर शेतकरी व रयत क्रांती संघटना असहकार आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com