सद्गगुरू मोटरसायकलवर शंभर देश का फिरले ?

‘माती वाचवा’ या मोहिमेतंर्गत सद्गुरू यांनी 100 दिवसात 27 देशांना भेटी दिल्या आहेत. ही त्यांची सोलो बाइक राईड होती. 26 देशांना भेट देऊन त्यांच नुकतंच भारतात आगमन झालंय.
सद्गगुरू मोटरसायकलवर शंभर देश का फिरले ?
Save SoilAgrowon

माणसाला जेव्हापासून शेतीचा (Agriculture) शोध लागला तेव्हापासून त्याने मारून खाण्याऐवजी पेरून खायला सुरुवात केली. मातीत (Soil) पेरलेल्या एका दाण्यातून हजार दाणे निर्माण करता येतात या शोधावरचं आजच्या संस्कृतीचं बिज रोवलं गेलं. आणि या सुपिक मातीवरच आपल्या शेतीचा आणि अवघ्या जिवसृष्टीचा डोलारा उभाय. पण जिला आपण काळी आई म्हणुन गौरवतो ती आज मरणासन्न अवस्थेत आहे. थोडक्यात आपल्या मातीला प्रदूषणाचं ग्रहण लागलय.

हे ग्रहण सोडवून माती वाचवण्यासाठी ईशा फांउडेशनचे संस्थापक सद्गुरू अर्थात जग्गी वासुदेव यांनी माती वाचवा मोहीम हाती घेतलीयं. ‘माती वाचवा’ या मोहिमेतंर्गत सद्गुरू यांनी 100 दिवसात 27 देशांना भेटी दिल्या आहेत. ही त्यांची सोलो बाइक राईड होती. 26 देशांना भेट देऊन त्यांच नुकतंच भारतात आगमन झालंय. सद्गुरुंच्या माती वाचवा मोहिमेमुळे मातीच्या प्रदूषणाचं प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कनवेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन यांच्या माध्यमातून माती वाचवा मोहीम सुरु आहे. 2050 सालापर्यंत जगभरातील सुमारे 90 टक्के मातीचा र्‍हास होण्याचा अंदाज संबंधित संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आलायं. माती जर नष्ट झाली तर जगभरात पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आपत्ती उद्भवतील. तीव्र स्वरुपाचे हवामान बदल, अन्न आणि पाण्याची जागतिक टंचाई, भीषण नागरी संघर्ष आणि प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा आणि सांस्कृतिक रचना धोक्यात आणणार्‍या स्थलांतराचा त्या परिणामात समावेश होईल. आणि मातीचं संवर्धन केलंच तर हे प्रश्न सुटतील.

उदाहरण म्हणून आपण सिंधू संस्कृतीचंच उदाहरण घेऊ. भारतात ‌सिंधूच्या खोऱ्यात गाळाची माती होती. पुराबरोबर येणारा गाळ तिथं जमा झाला होता. त्यात पिकांची उत्पादकता वाढविण्याची ताकद होती. साहजिकच अन्नधान्य वाढलं आणि संपन्नता आली. सिंधू संस्कृतीत नगर वसली. त्यातलं मूळ नगर म्हणजे मोहाेंजोदाडो. पण पुढं ही सिंधू संस्कृती नामशेष झाली. याचं मुख्य कारण होतं मातीच्या आरोग्यात झालेला बिघाड.

मागच्या ६५ वर्षांत भारतात उन्नती झाली. अन्न-धान्यचं उत्पादन पाच पटीने वाढलं. सन १९५१ - ५२ मध्ये अन्नधान्याचं ५१ दशलक्ष टन उत्पादन होतं. ते सन २०१३ मध्ये २५७ दशलक्ष टन एवढं वाढलं. पण नंतर ही वाढ थांबायला लागली. याला दुष्काळीस्थिती म्हंटल गेलं.पण हे काही खरं नव्हतं. याचं उत्तम उदाहरण ऊस हे पीक होतं. बारमाही सिंचन असलेल्या उसाच्या पिकाचं महाराष्ट्रात दर हेक्टरी उत्पादन जास्त होतं ते टप्प्याटप्प्याने कमी झालं. म्हणजे १९६०-६१ मध्ये दर हेक्टरी १०० टन ऊसाच उत्पादन ८० टनापेक्षा खाली आलं. याचं मुख्य कारण होतं मातीच्या आरोग्यात बिघाड. महाराष्ट्रात २२५ लाख लागवडीयोग्य जमिनींपैकी ९७.५ लाख हेक्टर क्षेत्रातील माती अवनत झाली आहे. म्हणजेच मातीचं आरोग्य धोक्यत आलं आहे.

आज आपण कितीही शोध लावू पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे माती ही काही कारखान्यांत तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो.लाखो वर्षे ही प्रक्रिया सुरू असते. साधारण 1 सेंमी. मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात.

पण शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते आहे. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतोय. त्याचप्रमाणे खतांच्या वाढत्या वापराने सुपीक जमीन नापिक होण्याची शक्यता वाढलीय. मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती साधली तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करू शकत नाही हे वास्तव आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com