
Safflower Harvesting लातूर : लातूर कृषी विभागातील (Agriculture Department) पाचही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९% पेरणी झालेले गव्हाचे पीक (Wheat Crop) सध्या ओंबी भरण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत आहे. दुसरीकडे पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या करडईची (Safflower Harvesting) काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे.
लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात १६ लाख ७९ हजार ३६१ अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२३ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.
पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये रब्बी ज्वारी २ लाख ९७ हजार ९०७ हेक्टर, गहू १ लाख ५४ हजार २१६ हेक्टर, हरभरा ११ लाख ५९ हजार ८३९ हेक्टर, मका १७ हजार ७६४ हेक्टर तर करडई २३ हजार ९४८ हेक्टर क्षेत्रावर पेरली गेली आहे.
ज्वारीचे पीक सध्या दाणे भरण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रब्बी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
हरभरा पिकावर सर्व जिल्ह्यात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर काही ठिकाणी अल्प प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव होईल आढळून आला आहे.
शेतकऱ्यांना याविषयी संरक्षणात्मक उपाय सुचविले जात आहेत. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेल्या मका पिकाला सध्या कणसे निघणे सुरू आहे.
पीक, सर्वसाधारण क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी
रब्बी ज्वारी ३७१८५७ २९७९०७
गहू १५६५१९ १५४२१६
हरभरा ७८६१२४ ११५९८३९
रब्बी मका १७९७१ १७७६४
करडई १९५३१ २३९४८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.