
गणेश गोडसे हे प्रगतिशील शेतकरी (Progressive Farmer) आहेत. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथूनच जवळ असलेल्या खेडेगावात ते शेती (Agriculture) करतात. ते चौकस वृत्तीचे असल्याने नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाच्या (Agriculture Technology) शोधात असतात. हे करत असताना त्यांना ‘सलाम किसान' (Salam Kisan) विषयी माहिती मिळाली.
सलाम किसान हे शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेले सुपरॲप (Salam Kisan Supper App) आहे. गोडसे यांनी त्याचा उपयोग करून पीक व्यवस्थापन (Crop Management) आणि सिंचन याबाबतीत योग्य नियोजन केले.
त्यांच्याकडे एकूण १२ एकर जमीन आहे. त्यात ६० टक्के क्षेत्रामध्ये फळबाग आहे; तर ४० टक्के क्षेत्रात सोयाबीन, हरभरा, कापूस, गहू ही पिके ते घेतात.
गणेश गोडसे गेल्या वर्षीपासून वरद क्रॉप सायन्स व वरद तंत्राचा वापर आपल्या शेतीमध्ये करतात. हे तंत्र वापरण्याचा सल्लासुद्धा त्यांना ‘सलाम किसान'कडूनच मिळाला होता.
ते आता शेतीविषयक प्रत्येक सल्ला ‘सलाम किसान'कडूनच घेत असतात. त्यामुळे आपल्याला खूप फायदा झाल्याचा दावा गोडसे यांनी केला आहे.
गोडसे यांच्या जमिनीची प्रत मध्यम असून त्यांनी सुयोग्य व्यवस्थापनाच्या बळावर पिकांचे चांगले उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी प्रचंड पाऊस झाल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
परंतु गोडसे यांनी ‘सलाम किसान'च्या सेवेची मदत घेतल्यामुळे त्यांना नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे शक्य झाले.
त्यांनी एका एकरात सोयाबीनचे नऊ क्विंटल उत्पादन घेतले. तर हरभऱ्याचे एकरी १४ क्विंटल उत्पादन घेतले. विशेष म्हणजे कलिंगडाचे विक्रमी ६५ टन उत्पादन त्यांनी घेतले. ‘सलाम किसान'ने केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे गोडसे सांगतात.
‘वरद क्रॉप सायन्स'चे प्रतिनिधी त्यांच्या घरी विशेष भेटीसाठी गेले होते. गोडसे यांच्या नवीन घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे.
त्यांच्या घरात पारंपरिक बाज आणि आधुनिक सुविधा यांचा सुरेख मेळ आहे. आपल्या प्रगतीत ‘सलाम किसान'चा मोठा वाटा असल्याचे ते सांगतात.
धनश्री मानधनी या ‘सलाम किसान'च्या संस्थापक आहेत. प्रद्युमन मानधनी हे कंपनीचे संचालक आहेत तर अक्षय खोब्रागडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.