Fertilizer : विविध ग्रेडच्या १९ हजार टन रासायनिक खतांची विक्री

परभणी जिल्ह्यत यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात सोमवारपर्यंत (ता. २८) विविध ग्रेडच्या १९ हजार २४८ टन रासायनिक खतांची विक्री झाली.
Fertilizer Linking
Fertilizer LinkingAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यत यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात (Rabi Season) सोमवारपर्यंत (ता. २८) विविध ग्रेडच्या १९ हजार २४८ टन रासायनिक खतांची (Fertilizer ) विक्री झाली. विविध ग्रेडचा मिळून २५ हजार ६०३ टन खतसाठा शिल्लक होता.

Fertilizer Linking
Rabi Irrigation : कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन सुरू करण्याची मागणी

यंदाच्या रब्बी हंगामासाठी विविध ग्रेडच्या १ लाख ३ हजार ८०० टन खतांची मागणी करण्यात आली होती. परंतु ५८ हजार ४३० टन खतसाठा मंजूर करण्यात आला. त्यात युरिया २० हजार ५१० टन, डीएपी ७ हजार ११० टन, पोटॅश १ हजार ७५० टन, एनपीके २० हजार २७० टन, सिंगल सुपर फॉस्फेट १ हजार ३१९ टन या खतांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात विविध ग्रेडच्या ८ हजार ७६७ टन खतसाठा मंजूर आहे.

ऑक्टोबर महिन्यात १८ हजार ९४ टन खतांचा पुरवठा झाला. सप्टेंबरअखेर २६ हजार ७०२ टन खतसाठा शिल्लक होता. त्यामुळे रब्बीसाठी एकूण ४४ हजार ८५१ टन खतसाठा उपलब्ध होता. सोमवारपर्यंत (ता. २८) १९ हजार २४८ टन खतांची विक्री झाली. त्यात युरिया ६ हजार ३०५ टन, डीएपी २ हजार ९७४ टन, पोटॅश ९४ टन, संयुक्त खते (एनपीके) ८ हजार टन, सिंगल सुपर फॉस्फेट १ हजार टन या खतांचा समावेश आहे.

Fertilizer Linking
Rabi Crop Insurance : गेल्या रब्बीसाठीचा १८ कोटी ७८ लाखांचा पीकविमा मंजूर

भाव फलकावरील साठा माहिती अद्ययावत करणे आवश्यक...

जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक कृषी निविष्ठा केंद्रावर दर्शनी भागात खताचा प्रकार, दर, उपलब्ध साठा फलक आढळून येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या केंद्रावर उपलब्ध खतांचा साठा, दर या बाबत माहिती समजत नाही. अनेक विक्रेते ई-पॉस मशिनद्वारे खते विक्री करून खतसाठा अपडेट करत नाहीत. त्यामुळे एखाद्या केंद्रावरील खतसाठा संपलेला असला तरी संकेतस्थळावर मात्र खतासाठा शिल्लक असल्याचे दिसते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com