
परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi season) सोमवार (ता. २८)पर्यंत विविध पिकांच्या ५२ हजार ३७३ क्विंटल बियाण्याचा पुरवठा (Seed Supply) झाला. त्यापैकी ३८ हजार २८५ क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे. त्यात हरभऱ्याच्या ३३ हजार ३४० क्विंटल बियाणे विक्री झाली आहे. विविध पिकांचे १४ हजार क्विंटल बियाणे शिल्लक होते.
जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात २ लाख ७८ हजार ३९८ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यात हरभरा १ लाख ३७ हजार ९०६ हेक्टर, ज्वारी ९९ हजार ९४० हेक्टर, गहू ३७ हजार ३८६ हेक्टर, मका १ हजार ६२८ हेक्टर, करडई १ हजार ११६ हेक्टर, सूर्यफूल २३.२५ हेक्टर, इतर पिके ३९८.९७ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.
त्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सावर्जनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे २६ हजार ५६ क्विंटल आणि खासगी क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे २७ हजार ३१७ क्विंटल असे दोन्ही मिळून एकूण ५३ हजार ३७३ क्विंटल बियाण्याची मागणी केली होती. त्यानुसार ज्वारीच्या १ हजार ८९० पैकी १ हजार ५१० क्विंटल बियाण्याचा, गव्हाच्या १४ हजार ९५४ पैकी १० हजार ७५५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला,
१४ हजार क्विटंल बियाणे शिल्लक...
सार्वजनिक उत्पादकांचे २ हजार २०४ क्विंटल आणि खासगी कंपन्यांचे ११ हजार ८०७ क्विंटल मिळून एकूण १४ हजार ११ क्विंटल बियाणे शिल्लक होते. त्यात हरभऱ्याचे ६ हजार ४६९ क्विंटल, ज्वारीचे ८७० क्विंटल, गव्हाचे ६ हजार ५४३ क्विंटल, मक्याचे ८ क्विटंल, करडईचे १२१ क्विंटल बियाणे शिल्लक होते, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.