बियाणे महोत्सवात दहा हजार क्विंटल बियाण्याची विक्री

कृषी विभागाचा दावा; उपक्रम राज्यभर नेण्यासाठी प्रयत्न
बियाणे महोत्सवात दहा हजार क्विंटल बियाण्याची विक्री
Seed FestivalAgrowon

अकोला ः जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या बियाणे महोत्सवाला (Seed Festival) चांगला प्रतिसाद मिळाला. एक ते सहा जून या काळात महोत्सवात १०१७३ क्विंटल बियाण्याची विक्री (Seed Sale) झाल्याचा दावा कृषी विभागाने (Department Of Agriculture) केला आहे. या माध्यमातून २९ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचेही सांगितले जाते. दुसरीकडे याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता हा उपक्रम राज्यभर नेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन पालकमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी दिले.

शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत बियाणे महोत्सव जिल्ह्यातील बाजार समित्यात आयोजित करण्यात आला होता. या वेळी समारोपीय सत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत, कृषी उपसंचालक संध्या करवा, प्रगतिशील शेतकरी महादेवराव भुईभार, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, मंडल कृषी अधिकारी प्रदीप राऊत, आर. एच. राखोडे, कृषी अधीक्षक गजानन महल्ले, रूपेश दिक्षीत तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बच्चू कडू म्हणाले, की शेतकरी असलेल्या बियाणे उत्पादकांचा माल शेतकऱ्यांनी बाजारापेक्षा स्वस्तात खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांची बचत झाली. तर उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ झाली. हा उपक्रम दरवर्षी राबविण्याचा निर्धार सर्वांनी केला पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य विक्री केंद्रासोबतच बियाणे विक्री केंद्र म्हणून नावलौकिकास येत आहे. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विक्रमी बियाणे खरेदी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com