Paddy Harvesting : हंगाम लांबल्याने विक्रीला फटका

यावर्षी भाताची कापणी उशिरा झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियमित वेळेत धान विक्रीसाठी उपलब्ध करता येणार नाही.
Paddy Harvesting
Paddy Harvesting Agrowon

जव्हार, जि. पालघर : जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये शेती (Agriculture) हाच येथील नागरिकांचा पिढीजात व्यवसाय आहे. तालुक्यातील ३५ टक्के नागरिक हे अल्पभूधारक (Marginal Farmer) आणि शेतमजूर (Agriculture Laborer) आहेत. असे असताना निसर्गाचा लहरीपणा आणि वातावरणातील बदल (Climate Change) या गोष्टीमुळे शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसटतो की काय, अशी परिस्थिती निर्माण होत असते, शिवाय यंदा परतीच्या पावसामुळे भात कापणीचा हंगाम (Paddy Harvesting Season) लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने यंदाच्या वर्षीची या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

Paddy Harvesting
Paddy Crop Damage : पावसामुळे भातशेती संकटात

यावर्षी भाताची कापणी उशिरा झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियमित वेळेत धान विक्रीसाठी उपलब्ध करता येणार नाही. असे झाल्यास येथील शेतकऱ्यांना नाईलाजास्तव भात कापणी झाल्यानंतर आपले धान्य खाजगी व्यापाऱ्याला विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. दिवाळी तोंडावर आली आहे. परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत आहे. धान कापणीचा हंगामही धोक्यात आला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात जाण्याशिवाय मार्ग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : सिंधुदुर्गमध्ये पंधरा दिवसांत अवघी ५ टक्के भातकापणी

दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू होऊ शकत नसल्याने आणि कापणीचा हंगाम लांबल्याने येथील शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्याला धान विक्री करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रतिक्विंटल तीनशे ते पाचशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. धान व्यापाऱ्याकडून आगाऊ पैसे घेऊन व्यापारी सांगेल त्या किमतीत धान विक्री करण्यासाठी पैसे घेतले जात आहेत.

भातपिकावर पावसाचे संकट

परतीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीला आलेली पिके अजूनही शेतातच असल्यामुळे भातगोटे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असले तरी कृषी विभागाने अद्याप कोणतेही पंचनामे केलेले नाहीत.आता परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भात कापणीला सुरुवात केली होती; परंतु पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे पूर्णतः भात पिकाला कोंब यायला सुरुवात झाल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.

मोबाईल ॲपवरून नोंदणी शक्य

धान खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी अडचणीची ठरत आहे. यासाठी पणन महासंघ लवकरच मोबाईल ॲप विकसित करणार असल्याचे कळते आहे. हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर घरबसल्या मोबाईलवरून धान खरेदीची नोंदणी करता येणार आहे; असे जव्हार येथील आदिवासी विकास महामंडळ कार्यालयातील धान खरेदी केंद्र विभागातून सांगण्यात आले आहे.

नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली आहे. नुकसानग्रस्त शेतीचा अहवाल करणे सुरू आहे. लागवडीच्या ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असेल त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळेल. लवकरच पंचनामे केले जातील.
अनिल नळगुलवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com