
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (Rural Area) ६६७ पाणीनमुने दूषित (Contaminated Water) आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी व गुणवत्ता कक्षामार्फत जिल्ह्यात ६ हजार ९९१ जलस्रोतांमधील (Water Resources) पाण्याची तपासणी १० ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात करण्यात आली. त्याचा अहवाल जाहीर झाला आहे.
महिला जलसुरक्षक, आरोग्य सेवकांच्या मदतीने जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायत क्षेत्रातील ११ हजार ७३ पाणीस्रोतांचे नमुने तपासण्यात आले. एफटीके कीटद्वारे केलेल्या तपासणी ६६७ पाणीनमुने हे जैविक व रासायनिकदृष्ट्या दूषित आढळून आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात आली.
जलजीवन मिशन अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून पाणी स्रोतांचे नमुने गोळा करून तपासणी करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने ८४० ग्रामपंचायतींमधील ६ हजार ९९१ पाणीस्रोतांच्या नमुन्यांची फील्ड टेस्ट कीटद्वारे होणारी जैविक तपासणी झेडपीमार्फत गावागावांत करण्यात आली. यामध्ये या जलस्रोतांव्यतिरिक्त शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालयातील पाणी स्रोतांचीही फील्ड टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात आली.
शुद्ध पाणी हे आरोग्याची हमी देत असते. त्यामुळे गावचे पाणी शुद्ध की अशुद्ध याची तपासणी ग्रामपंचायत क्षेत्रात महिला, जलसुरक्षक, आरोग्यसेवकांनी स्वत: एफटीके किटद्वारे केली आहे.
पाणी व स्वच्छता विभागासह भूजल सर्वेक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची तपासणी वर्षातून दोन वेळा केली जाते. याद्वारे केलेल्या तपासणीत ११ हजार ७३ नमुन्यांपैकी ६६७ नमुने जैविक रासायनिक रित्या दूषित आढळून आले आहेत.
ग्रामपंचायतींना कार्यवाहीचे निर्देश
११ हजार ७३ नमुन्यांपैकी ६६७ नमुने हे जैविकदृष्ट्या दूषित आढळले आहेत. या स्रोतांचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने निर्जंतुकीकरण करण्यात यावे व पाणी नमुने प्रयोगशाळेत फेरतपासणीसाठी पाठविण्यात यावेत, फेरतपासणीत परत दूषित आल्यास ग्रामपंचायतीमार्फत योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा लेखी सूचना बीडीओमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्याचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.