Lumpy Skin : पनवेलमध्ये गुरांचे नमुने तपासणी

पनवेल तालुक्याच्या वेशीवर लम्‍पीसदृश आजाराची लक्षणे आढळल्‍याने पाले खुर्द आणि वावंजेतील गुरांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत; पशु वैद्यकीय विभागाने विशेष खबरदारी घेतली असून पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी आढावा घेतला आहे.
Lumpy SKin
Lumpy SKinAgrowon

नवीन पनवेल : लम्‍पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्‍याने राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. पनवेल तालुक्याच्या वेशीवर लम्‍पीसदृश आजाराची लक्षणे आढळल्‍याने पाले खुर्द आणि वावंजेतील गुरांचे नमुने (Cattle Samples) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत; पशु वैद्यकीय विभागाने(Department of Veterinary medicine Veterinary medicine) विशेष खबरदारी घेतली असून पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर (Vijay Talekar) यांनी आढावा घेतला आहे.

Lumpy SKin
Bullet Train : राज्य सरकारचे बुलेट ट्रेनच्या गतीने काम सुरू ः बावनकुळे

राज्यातील नगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यांत अनेक जनावरांना लम्‍पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. रायगड जिल्ह्यात सर्वांत आधी कर्जतमध्ये आठ बैलांना बाधा झाल्‍याचे आढळले. त्‍यामुळे खबरदारी म्‍हणून सर्वच तालुक्यांत गुरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

Lumpy SKin
Beed Railway : स्वप्नपूर्ती झाली, आता विकासाला चालना मिळेल

पनवेल तालुक्यातील दोन गावांतील गुरांमध्ये लम्पी स्कीनसदृश लक्षणे आढळल्‍याने त्‍यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लम्पी स्कीन केवळ गोवंश व म्‍हैस‍ वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्‍वचाा आजार आहे. तो कीटकांपासून पसरत असल्‍याने पशुपालकांनी गुरांची योग्‍य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पनवेल तालुका शहरीबहुल असला तरी आजही शेती आणि पशुधन काही गावांमध्ये दिसून येते.

या ठिकाणी गोठे मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषकरून म्‍हशीच्या गोठ्यांची संख्या जास्‍त आहे. तालुक्यात जवळपास १३,२२६ जनावरे आहेत. त्यापैकी ४,५७२ गोवंशीय व ५,६६० म्‍हैसवर्गीय आहेत. तालुका प्रशासनाने गावागावांत सर्वेक्षण सुरू आहे. भित्तीपत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.गोठ्यांमध्ये फवारणी पनवेल महापालिका क्षेत्रात १७५ गोठे असून आठशे जनावरे आहेत.

म्‍हशींची संख्या याठिकाणी जास्त असून लम्‍पी स्कीन प्रतिबंधासाठी गोठ्यांमध्ये फवारणी करण्यात आली आहे. तसेच गोशाळेमध्ये सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वावंजे आणि पाले खुर्द या गावांमध्ये लम्पी स्कीनसदृश स्थिती निर्माण झाल्याने जनावरांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com