Nashik News : महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात साकारले ‘संवेदना उद्यान’

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श असे पंचज्ञानेंद्रियांना समर्पित ‘विद्यापीठ संवेदना उद्यान’ तयार करण्यात आले आहे.
Samvedna Garden
Samvedna GardenAgrowon

Nashik News : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra Health Science University) परिसरात रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श असे पंचज्ञानेंद्रियांना समर्पित ‘विद्यापीठ संवेदना उद्यान’ (Samvedna Garden) तयार करण्यात आले आहे.

या उद्यानाचा लोकार्पण सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते येथे नुकताच करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा चेन्नई येथील कर्मचारी राज्य विमा निगम महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कालिदास चव्हाण होते. ते म्हणाले, की उद्यानातील या वृक्षांचे वर्गीकरण रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श या पंचज्ञानेंद्रियांवर आधारित आहे. संवेदना उद्यानाच्या निर्मितीत काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.

Samvedna Garden
Nashik News: विजबिलांचे २८९ कोटी थकित

कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी, पर्यावरण संवर्धनासमवेत आरोग्य स्वास्थ्यासाठी हे उद्यान उपयोगी असून वृक्षांचे वर्गीकरण, लागवड व जोपासना कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आभार उपकुलसचिव डॉ. संजय नेरकर यांनी मानले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

रुची उद्यानातील वृक्ष व वनस्पती

फालसा, धामणी, अटरुन, भोकर, शिवण, जंगली अजान, ॲपल बोर, चोरोळी, सीताफळ, पेरू, अंजीर, आंबा, नारळ, चिकू, गोरख चिंच, फणस, सुपारी, मरूड शेंग, रामफळ, लिंबू, संत्रे, ड्रॅगन फ्रूट, चेरी, मोसंबी, जांभूळ, चिंच, डाळिंब.

Samvedna Garden
Nashik News: उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

श्रवण उद्यानातील वृक्ष व वनस्पती

गोल्डन बांबू, मारवेल बांबू, पम्पस गारस, सादडा, कुडा, चित्रक, मेहंदी, निरगुडी, हेन्कल, अडुळसा, प्लंबेगो, अबोली, कोरंटी, कुफीया, मुसांडा, कबवासी, जाटारोफा, रातराणी, मधुकामिनी, मोगरा, प्लुमेरिया आल्बा, प्लुमेरिया रुबरा, सीतारंजन, लेमणग्रास, मारवा.

Samvedna Garden
Nashik News: विजबिलांचे २८९ कोटी थकित

दृष्टी उद्यानातील वृक्ष व वनस्पती

रोईओ, टाकला, तरवड, कन्हेर, फाईक्स, जास्वंद, हमेलिया पॅटर्नस्, क्रॉटन, टगर, शंकासुर, मालफिगिया आदी वनस्पती आहेत.

पर्यावरण संवर्धनसाठी मानवी शरीरातील पंचज्ञानेंद्रियांवर आधारित संवेदना उद्यान साकारले आहे. मेडिकल टुरिझमच्या अनुषंगाने विद्यार्थी व अभ्यागतांना उद्यानातील वृक्षांची माहिती व मांडणी महत्त्‍वपूर्ण आहे. हे उद्यान पर्यावरण व स्वास्थ्यासाठी सर्वांना उपयुक्त आहे. विद्यापीठात ‘ग्रीन कॅम्पस’ उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे.

– माधुरी कानिटकर, कुलगुरू

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com