Sand Policy Maharashtra : नगरमध्ये एक मेपासून स्वस्तात मिळणार वाळू

नगर ‘‘जिल्ह्यात येत्या एक मेपासून सामान्य जनतेला ६०० रुपये ब्रास दराने वाळू दिली जाईल. राज्यात अशा पद्धतीने वाळू वितरण करणारा नगर हा पहिला जिल्हा असेल,’’ अशी घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
Sand Rate
Sand RateAgrowon

Nagar News : ‘‘जिल्ह्यात येत्या एक मेपासून सामान्य जनतेला ६०० रुपये ब्रास दराने वाळू (Sand Rate) दिली जाईल. राज्यात अशा पद्धतीने वाळू वितरण करणारा नगर हा पहिला जिल्हा असेल,’’ अशी घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी केली.

Sand Rate
Sand Mafia : वाळू चोरीविरोधात कारवाईचे सत्र

राहाता तालुक्यातील सावळेविहीर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन विखे यांच्या हस्ते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्‍घाटन, तसेच विद्यार्थिनींना सायकल, अस्थिव्यंग विद्यार्थिनींना व्हील चेअरचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे-पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे आदी उपस्थित होते.

Sand Rate
Sand Rate : स्वस्त दरात मिळणार वाळू

विखे-पाटील म्हणाले, ‘‘येत्या तीन महिन्यांत जमीनमोजणीची साडेतीन हजार प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून मोजणीचे नकाशे संबंधितांना घरपोच दिले. सावळेविहीर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्‍न एका महिन्याच्या आत सोडविला जाईल.

कोणतीही रेडीरेकनर आकारणी न करता ‘वर्ग २’च्या जमिनी ‘वर्ग-१’ मध्ये आणण्यात येतील. ग्रीन फिल्ड कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, शिर्डी विमानतळावर नाइट लॅडिंग, नवी टर्मिनल इमारत, सावळेविहीर येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखाना, ५०० एकर जागेत लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क होणार आहे. यामुळे या परिसरातून देशभरात मालाची ने-आण करणे शक्य होईल. त्यातून रोजगाराच्या संधी वाढतील.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com