
Nanded News : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापतीची निवडीची प्रक्रिया गुरुवारी (ता. १८) बिनविरोध पार पडली.
सभापतिपदी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतिपद शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील डक यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सभापती व उपसभापतिपदाचा कार्यकाळ अडीच अडीच वर्षांचा ठरला असून, अडीच वर्षांनंतर उपसभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे. सभापतिपद काँग्रेसकडेच राहणार असून, अडीच वर्षांनंतर सभापती बदला जाणार आहे.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनेलला एकहाती सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीचा सभापती उपसभापतींची होणार हे निश्चित होते. बाजार समितीच्या सभागृहात निर्वाचन अधिकारी अनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.
या बैठकीला नवनिर्वाचित संचालक संजय देशमुख लहानकर, श्यामराव पाटील टेकाळे, भगवानराव पाटील आलेगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा सदाशिवराव देशमुख नीलेश देशमुख गांधी पवार, ज्ञानेश्वर राजेगोरे, आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.