ठाकरे कुटुंब आणि शाहूमहाराजांचे एक नाते

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली.
Sanajay Raut
Sanajay RautAgrowon

कोल्हापूर : मी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी मला फोन करून कोल्हापुरात आहात, तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले होते. त्यानुसार मी आज त्यांचे आशीर्वाद घेतले. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचे एक नाते आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराजांना फोनवर मी स्वतः: कोल्हापुरात येईन, असे सांगितले, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांची रविवारी (ता.२९) भेट घेतली. दहा ते पंधरा मिनिटे शाहू महाराज व संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. राज्यसभेसाठी गणित जुळवून न आणता पक्ष घोषित करणे हा संभाजीराजेंचा निर्णय चुकला. ज्यांच्याकडे मते जास्त आहेत, त्यांच्याकडे ते ॲप्रोच झाले नाहीत, असे भाष्य संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे.

शाहू महाराज राज्यसभेच्या जागेसाठी झालेल्या वादावर दोन दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. शिवसेनेने जागा नाकारून छत्रपती घराण्याचा अपमान केला, असे म्हणण्याचा प्रश्न येत नाही. हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आले असते तर विषय वेगळा असता, पण तसे काही झाले नाही. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली. आमच्यात काही विचार विनिमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसे काही झाले नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते, असे शाहू महाराज म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com