शेगावीचा राणा पंढरीच्या वाटेने

संत गजानन महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ
शेगावीचा राणा पंढरीच्या वाटेने

शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीतून सोमवारी (ता. सहा) संत गजानन महाराज संस्‍थानची पालखी मार्गस्थ झाली. मजलदरमजल करीत पालखी ८ जुलैला पंढरपूरमध्ये पोचणार आहे.

पंढरपूरच्या आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होण्यासाठी शेगाव येथून गजानन महाराजांची पालखी सकाळी ७ वाजता निघाली. यंदाचे हे ५३ वे वर्ष असून पालखीत ७०० वारकरी सहभागी आहेत. कोरोना काळामुळे गेले दोन वर्षे पालखी सोहळा खंडित होता. यंदा परिस्थिती सुधारलेली असल्याने गजानन महाराजांची पालखी पंढरपूर यात्रेत सहभागी होत आहे. संत गजानन महाराजांचा जयघोष करीत टाळ-मृदंगांच्या गजरात पालखी निघाली.

श्रींची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परभणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. आठ जुलैला पालखी पंढरपूरमध्ये पोचेल. त्यानंतर १२ जुलैपर्यंत मुक्काम करून आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर १३ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगावकडे परतीच्या मार्गाने निघेल. तीन ऑगस्टला पालखी खामगावमार्गे संतनगरी शेगावला दाखल होणार आहे. दरवर्षी पालखी मार्गावर होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता यंदा व्यवस्थापनाने काही ठिकाणीच्या मुक्‍कामांची जागा तसेच इतर नियोजनात बदल केला आहे.

दोन दिवस पालखी अकोल्यात

८ जूनला पालखी अकोल्यात दाखल होणार आहे. शहर परिक्रमा केल्यानंतर पालखीचा ८ व ९ जूनला मुक्काम राहील. त्यानंतर १० जूनला पालखी वाडेगावकडे रवाना होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com