Crop Damage : अतिवृष्टिग्रस्त निधी वितरण प्रक्रियेत सरपंच संघटना देणार योगदान

शेतकऱ्यांचे खाते ई-केवायसी नसल्याने अडचण येण्याची शक्‍यता आहे. ही अडचण सोडविण्यासाठी सरपंच संघटना मदत करेल, असे आश्‍वासन सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांनी दिले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

वर्धा अतिवृष्टीग्रस्तांना (Heavy Rain Affected Farmer) वाटपासाठी निधीची उपलब्धता शासनस्तरावरून झाली आहे. थेट खात्यात हा निधी वळता करण्यात येत असला तरी या कामात काही शेतकऱ्यांचे खाते ई-केवायसी (E kyc) नसल्याने अडचण येण्याची शक्‍यता आहे. ही अडचण सोडविण्यासाठी सरपंच संघटना (Sarpanch Sanghatana ) मदत करेल, असे आश्‍वासन सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांनी दिले.

Crop Damage
Soybean Rate : सोयाबीन बाजार कसा राहील?

निधी वितरणातील समस्यांचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला गावांशी थेट कनेक्‍ट असलेल्या सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडून निधी महसूल विभागाला मिळाल्याची माहिती दिली. त्याचे वाटप करताना सर्व शेतकरी खातेदार यांची माहिती युद्ध पातळीवर जमा करण्याची कसरत महसूल विभागाला करावी लागणार आहे. अनेक खातेदारांची खाती ही ई-केवायसी झालेली नाहीत. परिणामी त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

Crop Damage
Cotton Rate : पूर्वहंगामी कापूस पिकात दोनच वेचण्या होणार

नसल्याने प्रशासनासाठी अडचणीचे ठरेल. त्यामुळे ई-केवायसीच्या प्रक्रियेत सरपंच संघटनेने योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
 गावागावात प्रशासनाच्या मदतीने त्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यावर संमती दर्शविण्यात आली. या माध्यमातून मदत निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे शक्‍य होणार आहे. यावेळी राजेश सावरकर, सागर ठाकरे उपस्थित होते.
नुकसानग्रस्तांसाठीचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु काही शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्याने खात्यात निधी वर्ग होणार नाही. त्या पार्श्‍वभूमीवर सरपंच संघटनेच्या वतीने गावागावात ई-केवायसीसाठी प्रशासनाच्या मदतीने शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
                                                     - धर्मेंद्र राऊत, अध्यक्ष, सरपंच संघटना, वर्धा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com