दशकातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल सातारा जिल्हा बँकेचा सन्मान

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून, ग्रामीण व शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरविणेचा सातत्याने प्रयत्न करीत आहे.
Satara District Bank
Satara District BankAgrowon

सातारा : सहकार मंत्रालय, भारत सरकार (Ministry Of Cooperative Got Of India) आणि NAFSCOB यांचे संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ग्रामीण सहकारी बँकांची राष्ट्रीय परिषदेमध्ये (National Conference Of Cooperative Bank) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल’ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे शुभ हस्ते तसेच सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

Satara District Bank
Fertilizers : खतांचा अनावश्यक वापर कसा टाळाल?

याप्रसंगी अमित शाह म्हणाले, की सहकार मंत्रालय बळकट करण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि स्पर्धात्मक सहकारी संस्था निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक वंचित व्यक्तीसाठी विकासाच्या सुलभतेचे आव्हान पेलण्यासाठी सहकार मंत्रालय सतत काम करेल. सातारा जिल्हा बँक जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहे. बँकेचे कामकाज देशात आदर्शवत असून, सहकार बळकट करणेसाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले.

Satara District Bank
Crop Loan : पीक कर्जप्रश्‍नी कृषी समिती आक्रमक

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून, ग्रामीण व शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरविणेचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, की देशातील ३५१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची गेल्या दहा दहा वर्षातील कामकाजाची माहिती घेऊन सातारा जिल्हा बँकेच्या गेल्या दशकातील सातत्यपूर्ण कामगिरीची दाखल घेऊन विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे.

या वेळी डॉ. सरकाळे यांनी बँकेच्या दृष्टीने आणि सहकारासंबंधी असणाऱ्या विविध अडचणी संदर्भात प्रश्‍नांची मांडणी केली. या पुरस्काराबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील आणि सर्व संचालक सदस्य, यांनी अभिनंदन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com