DCC Bank Satara : ‘सातारा जिल्हा बॅंक सहकारातील आदर्श’

‘सातारा जिल्हा बँकेची देशात गौरवशाली परंपरा असून, या बॅंकेने देशाच्या सहकारात आपला वेगळा ठसा उमटविला आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय सहकार धोरण समितीचे विद्यमान अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी केले.
DCC Bank Satara
DCC Bank SataraAgrowon

सातारा : ‘‘सातारा जिल्हा बँकेची (DCC Bank Satara) देशात गौरवशाली परंपरा असून, या बॅंकेने देशाच्या सहकारात आपला वेगळा ठसा उमटविला आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय सहकार धोरण समितीचे (Central Co-operative Policy Committee) विद्यमान अध्यक्ष सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांनी केले.

DCC Bank Satara
Cotton MSP : कापसाला १२ हजार हमीभाव द्या

बँकिंग फ्रंटियर्स संस्थेमार्फत जिल्हा बँकेस सर्वोत्कृष्ट डिजिटल बँक, सर्वोत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन व सर्वोत्कृष्ट सहकारी बँक, असे पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री व केंद्रीय सहकार धोरण समितीचे विद्यमान अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्या हस्ते बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व संचालक प्रभाकर घार्गे यांच्यासह संचालकांनी स्वीकारला. या वेळी रिझर्व्ह बँकेचे माजी मुख्य सरव्यवस्थापक रत्नाकर देओळे, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, ज्युरी डॉ. एम. रामानुनी, प्रमोद कर्नाड, बँकिंग फ्रंटियर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबू नायर उपस्थित होते.

DCC Bank Satara
Soybean Rate : सोयाबीन बाजाराला पामतेलाचा आधार

या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर, सुनील खत्री, रामराव लेंभे, ज्ञानदेव रांजणे, प्रदीप विधाते, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका सौ. कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, प्रशांत देशमुख उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com