Rain : रत्नागिरीत समाधानकारक पाऊस

जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात विश्रांती घेतल्यामुळे उन्हाच्या तापाने भातशेते कोरडी पडू लागली होती; मात्र ऑगस्टमधील पावसाने बळीराजाला तारले.
Rain Update
Rain UpdateAgrowon

रत्नागिरी ः ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे (Rain) गतवर्षीच्या सरासरीतील तफावत कमी झाली आहे. गतवर्षी ३२६७ मिलिमीटर पाऊस झाला होता, यंदा २८०० मिमी नोंद झाली आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात विश्रांती घेतल्यामुळे उन्हाच्या तापाने भातशेते (Paddy Farm) कोरडी पडू लागली होती; मात्र ऑगस्टमधील पावसाने (Rainfall) बळीराजाला तारले.

Rain Update
Paddy : मावळात साडेतेरा हजार हेक्टरवर भात लागवड

जून महिन्यात पावसाचा जोर म्हणावा तसा नव्हता. परिणामी भात पेरणीची कामे लांबली. पुढे लावणीच्या कामांनाही उशीर होत गेला. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाला होता; परंतु गतवर्षीच्या तुलनेत सरासरीमध्ये एक हजारची तफावत होती. पुढे दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर ओसरला. दिवसातून एखादी-दुसरी सर पडत होती. त्यामुळे बळीराजा धास्तावला. भात रोपांच्या वाढीसाठी पुरेसे पाणी मिळणेही आवश्यक होते. अन्यथा रोपे करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने पुन्हा सुरुवात केली आणि धास्तावलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला.

Rain Update
Paddy : भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन

गेल्या पंधरा दिवसांमध्ये एक हजार मिलिमीटरची तफावत कमी झाली आहे. वर्षातील सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा चारशे मिलिमीटर कमी नोंद आहे. गतवर्षी आतापर्यंत ३२६७ मिलिमीटर पाऊस झाला होता, यंदा २८०० मिमी नोंद झाली आहे.

गेल्या दोन दिवसांत सरींचा पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ३१ मिलिमीटर सरासरी नोंद झाली. सर्वच तालुक्यांत पाऊस झाला. बुधवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. सूर्यदर्शनही झाले असून ऊन पडले आहे. पावसामुळे भातशेती चांगलीच तरारली असून उत्पादन वाढीला पोषक स्थिती असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. सरींवरचा पाऊस सुरू राहिला तर भातशेतीला पूरक वातावरण राहील. पण कडकडीत ऊन पडले तर निळ्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव शेतीवर होऊ शकतो. हे भुंगेरे भात रोपांची पाने कुरतडून टाकतात. हरीत द्रव्य शोषून घेतल्यामुळे पाने पिवळी पडतात.

ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे भातशेतीला समाधानकारक वातावरण आहे. रत्नागिरीतील काही ठिकाणी पिकांची पाहणी केली, परिस्थिती चांगली आहे.

- व्ही. व्ही. दळवी, वरिष्ठ संशोधक, भात संशोधन केंद्र.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com