Water Supply : सतसाधक सहकारी पाणीपुरवठा संस्था संकटात

सुमारे तीस वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सतसाधक सहकारी संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून येडगाव धरणावरून सुमारे १० किलोमीटर अंतरावरून पाणी आणून शेतीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
Water Supply
Water SupplyAgrowon

पुणे : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील सुमारे ७०० एकर शेतीला पाणीपुरवठा (Agriculture Water Supply) करणारी सतसाधक सहकारी पाणीपुरवठा संस्था (Satsadhak Water Supply Organization) आर्थिक संकटात सापडली आहे. यामुळे शेतीसह त्यावर अवलंबून असणारा दुग्धोत्पादन (Dairy) व्यवसायदेखील अडचणीत येणार आहे. जिल्ह्यातील निवडक सहकारी संस्थांपैकी असलेल्या या तीस वर्षे जुन्या संस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी शासन, लोक प्रतिनिधी, सेवाभावी संस्थांनी मदत करावी, असे आवाहन संस्थेचे चेअरमन दयानंद कुटे यांनी केले आहे.

Water Supply
Water Scheme : ‘बोरी-आंबेदरी’ प्रकल्पाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

सुमारे तीस वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सतसाधक सहकारी संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून येडगाव धरणावरून सुमारे १० किलोमीटर अंतरावरून पाणी आणून शेतीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून कोरोना टाळेबंदी, अतिवृष्टी, शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी चहूबाजूने अडचणीत सापडल्याने संस्थेची वसुली होऊ शकलेली नाही. निधीअभावी संस्था वीजबिल, पाणीपट्टी, देखभाल दुरुस्ती, तसेच बंद पडलेले रोहित्र नव्याने बसविण्यासाठी आवश्यक असलेला खर्च करू शकत नाही.

Water Supply
Water Scarcity : धुळे जिल्ह्यातील ९७ गावांत पाणीटंचाईचे संकट शक्य

त्यामुळे सुमारे ६०० शेतकरी सभासदांच्या शेतीला पाणीपुरवठा करणारी ही योजना बंद पडण्याच्या स्थितीत असल्याचे चेअरमन दयानंद कुटे यांनी सांगितले.उपाध्यक्ष सुखदेव कुटे म्हणाले, की पिंपरी पेंढारच्या उत्तरेकडे असलेल्या डोंगराळ भागालगतच्या गायमुखवाडी, खारवणा, जांभूळपट आणि नवलेवाडी या भागांतील कोरडवाहू क्षेत्रासह गावशिवारातील शेतीसाठी संस्थेमार्फत पाणीपुरवठा केला जातो.

शेती पिकांबरोबरच जनावरांच्या पशुखाद्यासाठी पर्यायाने दुग्धोत्पादनासाठी या योजनेतून पाणी मिळते. तसेच या भागातील पिण्याच्या पाण्यासाठी देखील ही योजना महत्त्वपूर्ण आहे. ही संस्था पुनरुज्जीवित ठेवण्यासाठी राज्य शासन, पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह कृषी विकासासाठी कार्यरत असलेल्या संस्थांनी मदत करावी, अशी विनंती सचिव संतोष मांडे, यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com