Savitribai Phule Jayanti : सिंदखेडराजात सावित्री-जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. हा सोहळा छोट्या स्वरूपात साजरा झाला. या वर्षी नगर परिषदेने मोठे आयोजन केले आहे.
Savitribai Phule Jayanti
Savitribai Phule JayantiAgrowon

बुलडाणा ः राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी (Jijau Birth Place) सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती (Savitribai Phule Jayanti) ते राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीपर्यंत (ता. ३ ते १२) हा जन्मोत्सव सोहळा होत आहे.

Savitribai Phule Jayanti
Education System : ती आई होती म्हणुनी...

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. हा सोहळा छोट्या स्वरूपात साजरा झाला. या वर्षी नगर परिषदेने मोठे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांचा प्रारंभ मंगळवारी (ता. ३) आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते होत आहे. तसेच याच दिवशी शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा होत आहे. बुधवारी (ता. ४) सायंकाळी सोहम महाराज काकडे यांचे कीर्तन होईल.

Savitribai Phule Jayanti
Girls Education : काळोखाला दूर सारू, सावित्रीच्या लेकी आम्ही!

याशिवाय ५ ते १० जानेवारीदरम्यान दररोज सायंकाळी विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संत सावता भवन या ठिकाणी होतील. १२ जानेवारीला सूर्योदयी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त राजवाड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. शिंगणे, माजी आमदार डॉ. खेडेकर, आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते.

तसेच आमदार संजय गायकवाड, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी मंत्री रणजित पाटील, आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेश एकडे, आमदार श्‍वेताताई महाले, आमदार वसंत खंडेलवाल, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या विशेष उपस्थितीमध्ये महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्ष सतीश तायडे, उपनगराध्यक्ष भीमा पंडित जाधव, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह सभापती, नगरसेवक, नगरसेविका व अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com