Banana : राज्यात केळी रोपांची टंचाई

राज्यात मागील हंगामासारखीच यंदाही केळीच्या उतिसंवर्धित रोपांची टंचाई तयार झाली आहे. ही टंचाई लवकरच दूर होईल, असेही जाणकारांचे मत आहे.
Banana
Banana Agrowon

जळगाव ः राज्यात मागील हंगामासारखीच यंदाही केळीच्या उतिसंवर्धित रोपांची टंचाई (Banana Plant Shortage) तयार झाली आहे. ही टंचाई (shortage Of Banana Plant) लवकरच दूर होईल, असेही जाणकारांचे मत आहे. सुमारे ५० लाख केळी रोपांचा तुटवडा जुलैत जाणवल्याची माहिती आहे.

केळी लागवड (Banana Cultivation) राज्यात यंदा किंचित वाढू शकते. ही लागवड सुमारे ८३ हजार ते ८३ हजार ५०० हेक्टरवर होईल. लागवड सुरूच आहे. राज्यात यंदा फक्त एक ते दीड हजार हेक्टरने केळी लागवडीत वाढ होईल, असा अंदाज आहे. यात केळी रोपांच्या लागवडीखालील क्षेत्रही स्थिर राहणार आहे. केळी लागवड सोलापूर जिल्ह्यात वाढण्याचा अंदाज होता. परंतु सोलापुरात उसतोडणीला उशीर झाल्याने अनेक शेतकरी केळी लागवडीचे नियोजन यशस्वी करू शकले नाहीत.

Banana
केळी उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले

जळगाव जिल्ह्यात मागील हंगामात ४९ हजार हेक्टरवर केळी लागवड झाली होती. यंदा ही लागवड ५० हजार हेक्टरवर होईल.

१८ हजार हेक्टरवर रोपांची लागवड

राज्यात केळीच्या उतिसंवर्धित रोपांची सुमारे १८ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यासाठी सहा कोटी रोपांचा उपयोग झाला आहे. लागवड जून व जुलैत अधिकची झाली. याच काळात रोपांचा मोठा तुटवडा झाला. केळी रोपांचे दर मात्र स्थिर राहिले. प्रतिरोप १५ रुपये, याप्रमाणे केळीच्या उतिसंवर्धित रोपांची विक्रीही राज्यात झाली. उर्वरित क्षेत्रात केळीच्या कंदांचा उपयोगही झाला आहे. त्यासाठी महालक्ष्मी, श्रीमंती, अर्धपुरी, आंबेमोहोर, सातमासी, उतिसंवर्धित रोपांच्या बागेतील कंदांचा उपयोग केळी उत्पादकांनी केला आहे.

Banana
Banana Rate : केळी दोन हजार रुपये क्विंटल

रोपांच्या लागवडीत मात्र फारशी वाढ झालेली नाही. कारण मागील हंगामात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अनेक रोपेनिर्मिती कंपन्यांना मागणीअभावी रोपे नष्ट करावी लागली होती. तसेच पुढे म्हणजेच जानेवारी ते मार्चदरम्यान केळी दर दबावात होते. ही बाब लक्षात घेता रोपांचे मागील हंगामाएवढेच उत्पादन किंवा निर्मितीचे नियोजन कंपन्यांनी केले. परिणामी, रोपांच्या क्षेत्रातील वाढ झालेली नसल्याची माहिती मिळाली.

टंचाई ऑगस्टमध्ये कमी

केळी रोपांची टंचाई ऑगस्टमध्ये कमी राहणार आहे. या काळात रोपांचा पुरेसा पुरवठा कंपन्यांकडून होईल. ऑगस्टमध्येही केळीची लागवड बऱ्यापैकी होईल, असे सांगण्यात आले.

राज्यात केळीच्या सुमारे ५० लाख रोपांची टंचाई जुलैमध्ये राहिली. पण ही टंचाई ऑगस्टमध्ये राहणार नाही. गुणवत्तापूर्ण केळी उत्पादनाकडे शेतकरी वळत आहेत. यातूनच रोपांची मागणीही आहे. केळीची लागवडही राज्यात किंचित वाढेल, असे दिसते.
के. बी. पाटील, जागतिक केळीतज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com