Sugaracane Conference : ‘ऊस परिषदे’तून शास्त्रशुद्ध शेतीचा जागर व्हावा

ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी येथून पुढील काळात तांत्रिक बदल अत्यावश्यकच आहेत.
Sugarcane Conference
Sugarcane ConferenceAgrowon

Kolhapur News ऊस उत्पादकता (Sugarcane Productivity) वाढवण्यासाठी येथून पुढील काळात तांत्रिक बदल अत्यावश्यकच आहेत. परिषदेच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध शेतीचा (Scientific Agriculture) जागर व्हावा व तो राज्यभर जावा, अशी अपेक्षा माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने बामणी (ता. कागल) येथे आयोजित राज्यस्तरीय ‘ऊस विकास परिषदे’च्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते.

Sugarcane Conference
Cooperative Conference : आगामी दशक सहकाराचेच

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव ऊर्फ भैय्या माने, कागल तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब तुरुंबे, भारत ॲग्रो सर्व्हिसेसचे अध्यक्ष सत्यजित भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Sugarcane Conference
G-20 Conference : जी -२० परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींनी घेतला निरोप

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने-पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष किरण चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कृषिभूषण संजीव माने, डॉ. अरुण मराठे, शामकांत पाटील, उत्तमराव परीट आदींनी मार्गदर्शन केले.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतिशील ऊस उत्पादकांना ऊसभूषण कार्यगौरव, महाराष्ट्र ऊस विकास कार्यगौरव आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यात ‘ॲग्रोवन’चे कोल्हापूर प्रतिनिधी राजकुमार चौगुले यांना ‘ आदर्श कृषी पत्रकार कार्यगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com