
नगर ः ‘‘कृषी क्षेत्र हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सर्वोकृष्ट कार्य केलेले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात (MPKV, Rahuri औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर, हायपर स्प्रेट्रम तंत्रज्ञानाचा वापर, रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर, स्वयंचलित हवामान केंद्र व सिंचन प्रणाली यामध्ये उत्कृष्ट काम सुरू आहे. देश अन्नधान्याने स्वयंपूर्ण झाला आहे, याचे श्रेय पूर्णपणे कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनाला जाते,’’ असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज अहुजा यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज अहुजा यांनी भेट देऊन संवाद साधला. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव अभिलक्ष लिखी, आयुक्त (उद्यान) डॉ. नवीनकुमार पटले, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे उपसंचालक श्री. होशियार सिंग, अॅगमार्कचे विपणन विभागाचे संचालक बी. के. जोशी, विपणन अधिकारी सोनाली बागडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कुलसचिव प्रमोद लहाळे,
नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. गोरक्ष ससाणे उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणाले, ‘‘विद्यापीठाने विकसित विविध पिकांचे वाण हे राज्यातच नव्हे तर बाहेरच्या राज्यातही घेतले जातात. यामध्ये विद्यापीठाने विकसित डाळिंबाचा भगवा हा वाण देशात डाळिंबाच्या ८० टक्के क्षेत्रावर लावला जातो. राज्यातील उसाखालील क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्र हे या विद्यापीठाच्या विकसित वाणांखाली आहे.’’
यावेळी मान्यवरांना ड्रोनद्वारे औषधाची फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रक्षेत्र भेटीदरम्यान डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन नलावडे, डॉ. पवन कुलवाल, डॉ. सुनील कदम, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. राजेंद्र हिले, डॉ. जोशी यांनी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.